मांडवे ग्रामपंचायत पोट निवडणुकीत सौ. शोभाताई नाथा सिद यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेला ग्रामपंचायतमध्ये सेवा करण्याची संधी,

सौ. शोभाताई यांनी जपलेली नाती व सोज्वळ स्वभाव यामुळे मतदारांचे परिवर्तन

मांडवे ( बारामती झटका )

मांडवे ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक चार मधील पोट निवडणुकीत जय हनुमान पॅनलच्या अधिकृत उमेदवार सौ. शोभाताई नाथा सिद यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेला ग्रामपंचायतमध्ये जनतेची सेवा करण्याची संधी मिळणार असून सौ. शोभाताई सिद व त्यांच्या परिवाराने गावांमध्ये जपलेली नाती, समाजामध्ये वावरत असताना सोज्वळ स्वभाव यामुळे मतदारांचे परिवर्तन होत आहे.

मांडवे ग्रामपंचायत निवडणुक चुरशीची व रंगतदार होऊन जयवंत पालवे यांचे आठ सदस्य तर तानाजी पालवे यांचे आठ सदस्य निवडून आलेले होते. दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडलेली असल्याने चिठ्ठीद्वारे जयवंत पालवे गटाची चिट्ठी निघालेली असल्याने नऊ सदस्य झालेले होते. पैकी एक सदस्य मेहरबान उच्च न्यायालय यांनी ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केल्यानंतर पोट निवडणूक लागलेली आहे.

जय श्रीराम पॅनलच्या अधिकृत उमेदवार सौ. पुष्‍पाबाई पालवे व जय हनुमान पॅनलच्या सौ.शोभाताई सिद यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होत आहे. सौ. शोभाताई सिद सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचा सुसंस्कृत स्वभाव व गावातील लोकांच्या सुख दुःखामध्ये त्यांचा कायम सहभाग असून सर्वांना सहकार्य व सर्वांसोबत मिळून मिसळून त्या राहत असतात. त्यांच्या परिवारातील सदस्यांबरोबरच जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मतदारांचा स्वयंस्फूर्तीने उदंड प्रतिसाद मिळत आहे. वार्ड क्र 04 मध्ये बदलाचे वारे वहात असून सौ. शोभाताई सिद यांच्या रूपाने ग्रामपंचायतचे राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे. मतदारांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे जनशक्तीचा पाठिंबा सौ. शोभाताई सिद यांना मिळत आहे.

मतदान रविवार दि. 05/06/2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. दि‌. 06 रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहे. माळशिरस तालुक्याचे मांडवे ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीकडे जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleझी टॉकीज फेम ह.भ.प. सागर बोराटे महाराज यांचे सुश्राव्य किर्तन चाहुरवस्ती भांबुर्डी येथे होणार
Next articleडॉ. यशवंतराव कुलकर्णी यांना उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बेस्ट एमडी पुरस्काराने सन्मानित करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here