मांडवे येथील रत्नत्रय इंग्लिश स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील रत्नत्रय इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करता आला नाही, याची खंत विद्यार्थी व शाळा प्रशासन समितीने बोलून दाखविली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते येथील प्रसिद्ध व्यापारी सोहिल वैभवकुमार दोशी यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये माळशिरस येथील प्रसिद्ध व्यापारी अनिल जवाहर दोशी, रत्नत्रय शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी (दादा), मार्गदर्शक व रत्नत्रय पंतसंस्थेचे चेअरमन विरकुमारभैय्या दोशी, रत्नत्रय इंग्लिश मिडीयम, विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मांडवे चेअरमन प्रमोदभैय्या दोशी, सांस्कृतीक क्रीडा मंत्री डॉ. निवास गांधी तसेच अभिजीत दोशी, बाहुबली दोशी, वैभव शहा, संजय गांधी, व्हा.चेअरमन रत्नत्रय पतसंस्था सदाशिवनगरचे अजय गांधी, सुरेश गांधी, संचालक रत्नत्रय पतसंस्था सदाशिवनगर दत्तात्रय भोसले, चंद्रकांत तोरणे, संचालक रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे सुयोग दोशी, सौरभ दोशी, सागर दोशी, यश गांधी, सौ. पार्वती जाधव, ज्ञानेश राऊत आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष अनंतलाल दादा म्हणाले की, निस्वार्थीपणे केलेली सेवा ही ईश्वरचरणी प्रार्थना होते. यासाठी पुढील कालावधीमध्ये विद्यार्थी मित्रांनी समाजहिताची कामे करावीत व समाजाप्रती आपली भावना चांगली ठेवावी. देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये याची काळजी प्रत्येक विद्यार्थी व नागरिकांनी घेतली पाहिजे. यावेळी रत्नत्रय पतसंस्थेचे कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य अमित पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दैवत वाघमोडे सर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसुसंस्कृत आचार, विचार आणि स्वकर्तृत्वाने समाजात वेगळे स्थान निर्माण करणारे आदर्श नेतृत्व.
Next articleपुन्हा लहानपणाची 26 जानेवारी शाळेच्या अंगणात उतरावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here