माउलींच्या पालखीचे 21 जूनला प्रस्थान

लोणंद फलटणमध्ये माऊलींचा दोन दिवस मुक्काम

दोन वर्षानंतर पार पडणार पायी वारी सोहळा

आळंदी (बारामती झटका)

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा दोन वर्षानंतर पुन्हा मोठ्या उत्साहात मार्गस्थ होणार आहे. यंदा आळंदी येथून दि. 21 जून रोजी माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पार पडली. त्यात वरील नियोजन करण्यात आले आहे. यंदा तिथी वृद्धि झाल्याने लोणंद, फलटण येथे दोन दिवस मुक्काम वाढला आहे. दिंडीकरांच्या मागणीवरून संस्थानच्या सही शिक्क्याने यंदा वाहन पास देण्यात येणार आहे.

असा असेल पालखी सोहळा

 • आळंदी येथून मंगळवार दि. 21 जून 2022 रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल
 • बुधवार आणि गुरुवार दि. 23 जून पुणे मुक्कामी असेल
 • शुक्रवार शनिवार दि. 25 सासवड
 • रविवार दि. 26 जेजुरी
 • सोमवार दि. 27 वाल्हे
 • मंगळवार बुधवार दि. 29 लोणंद
 • गुरुवार दि. 30 तरडगाव
 • शुक्रवार व शनिवार दि. 2 जुलै फलटण
 • रविवार दि. 3 जुलै बरड
 • सोमवार दि. 4 जुलै नातेपुते
 • मंगळवार दि. 5 जुलै माळशिरस
 • बुधवार दि 6 जुलै वेळापूर
 • गुरुवार दि. 7 जुलै भंडीशेगाव
 • शुक्रवार दि. 8 जुलै वाखरी
 • शनिवार दि. 9 जुलै श्रीक्षेत्र पंढरपूर मुक्कामी
 • रविवार दि. 10 जुलै आषाढी एकादशीचा महासोहळा पार पडणार आहे
 • येथे होणार अश्वाचे गोल रिंगण
  पुरंदावडे (सदाशिवनगर)
  पानीव पाटी
  ठाकूरबुवा
  बाजीराव विहीर
 • येथे होणार उभे रिंगण
  चांदोबाचा लिंब
  बाजीराव विहीर
  इसबावी
 • नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कॅलेंडर प्रकाशन व जिलेबी वाटप
Next articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीनिमित्त आ. राम सातपुते यांचा झंझावाती दौरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here