Uncategorizedताज्या बातम्या

माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांची अतिक्रमणातील टपरी काढण्यात दादा दडस यांचा लढा यशस्वी झाला.

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर वनविभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेल्या माजी आमदाराची टपरी हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

माळशिरस ( बारामती झटका )

विधान परिषदेचे माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांनी पुणे-पंढरपूर रोडलगत वनविभागाच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करून टाकलेली टपरी त्वरित हटविण्यात यावी, यासाठी एकशिव गावचे सामाजिक कार्यकर्ते दादा जगू दडस यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस यांना निवेदन दिलेले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार चालढकल करीत होते. दादा दडस यांचा लढा सुरूच होता. महाराष्ट्रात सरकार बदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना नव्याने निवेदन देऊन सततचा पाठपुरावा केला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते दादा दडस यांच्या लढ्याला यश येऊन अखेर बेकायदेशीर वन विभागाच्या जागेतील टपरी वन विभागाने जमीनदोस्त केलेली आहे. वनविभागाने माजी आमदाराच्या विरोधातील सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल घेऊन बेकायदेशीर टपरी काढलेली असल्याने वनविभागाच्या जागेत अतिक्रमण केलेल्या नेत्यांचे व लोकांचे धाबे दणाणले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते दादा जगू दडस यांनी वनपरिक्षेत्र माळशिरस यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते कि, आपल्या हद्दीमध्ये मौजे नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर, पुणे-पंढरपूर रोड लगत पूर्व बाजूस म्हणजेच श्रीराम दूध प्रक्रिया संघासमोर माजी आमदार ॲड. रामहरी गोविंद रुपनवर यांनी आपल्या म्हणजेच वनविभागाच्या हद्दीमध्ये एक बेकायदेशीर टपरी उभा केलेली आहे. तसेच तेथूनच त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या दूध संघाला व आयटीआय कॉलेजला बेकायदेशीरपणे व पर्यायी रोड असताना अतिक्रमण करून रस्ता काढलेला आहे. तरी अतिक्रमित टपरी त्वरित हटवावी व वनविभागाच्या हद्दीतून काढलेला बेकायदेशीर रोडवरून जाणाऱ्या वाहनांच्या रहदारीमुळे तेथे लावलेल्या झाडांवरती धुळ व माती बसून ती झाडे खराब होत चाललेली आहेत. त्यामुळे शासनाचे तसेच झाडांचे प्रचंड नुकसान होत आहे. आपला विभाग सामान्य माणसाला साधी येणे-जाणेसाठी पाऊलवाट देत नाही. तेथे धनदांडग्या तसेच लोकप्रतिनिधींना बेकायदेशीरपणे रहदारीचे रस्ते व टपऱ्या टाकण्यास मुभा देते, हे अतिशय खेद युक्त आहे. तरी आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, वर नमूद केल्याप्रमाणे ॲड. रामहरी गोविंद रुपनवर यांनी आपल्या म्हणजेच वनविभागाच्या हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे केलेल्या अतिक्रमण त्वरित काढावे. अन्यथा नाईलाजास्तव मला आपल्या कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करावे लागेल.

असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दादा जगू दडस यांनी वनविभाग यांना दिलेले होते. सदरच्या निवेदनावर वनविभाग काय भूमिका घेते, याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले होते. वनविभागाच्या कारवाईनंतर माळशिरस तालुक्यात उलट सुलट चर्चेला सुरुवात झालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort