कारखान्याच्या कामगारांच्यावतीने विजयसिंह मोहिते पाटील यांचा विशेष सन्मान संपन्न.

सदाशिवनगर ( बारामती झटका )
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगरच्या डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प नूतनीकरणचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासद श्री. धोंडिबा काळे व संचालक श्री. बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना नियमित पगार व भविष्य निर्वाह निधी व सुरक्षा विमा योजनेचा लाभ लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रामभाऊ सातपुते, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस तथा शिवामृत दूध संघाचे चेअरमन श्री. धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत जि. प. सदस्या व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, पं. स. सभापती सौ. शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, सहकार महर्षी चे व्हा. चेअरमन प्रकाश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, कृ. उ. बा. स. चे माजी उपसभापती गणपतराव वाघमोडे, शिवामृत दूध संघाचे व्हा. चेअरमन सावता ढोपे, माळशिरसचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

तसेच यावेळी जि. प. माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जि. प. सदस्या संगिता मोटे, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माजी उपसभापती कुचेकर आबा, राहुलबापू वाघमोडे, पं. स. सदस्य मानसिंग मोहिते, अर्जुन धाईंजे, हनुमंत पाटील, ओंकार माने देशमुख, रामदास काळे, कृ.उ.बा.स. चे केशव कदम, विष्णुपंत केमकर, कांताआबा मगर, सहकार महर्षी चे संचालक लक्ष्मण शिंदे, विजय पवार, विजयकुमार देशमुख, अनिल कोकाटे, नितीनराजे निंबाळकर, भीमराव काळे, नामदेव आप्पा ठवरे, शंकरराव देशमुख, हनुमंत सरगर, चौगुले साहेब, शंकर सहकारी चे संचालक व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, दत्तात्रय रणवरे, धोंडीराम नाळे, सुरेश पाटील, चंद्रकांत शिंदे, सुधाकर पोळ, रामदास कर्णे, भगवान मिसाळ, दत्तात्रय चव्हाण, सुनील माने, नंदन दाते, दत्तू वाघमोडे, बलभीम पाटील, अमित माने, संजय कोरटकर, शिवाजी गोरे, रमेश जगताप, सुरेश मोहिते, सौ. देवयानी सालगुडे पाटील, शिवामृत चे संचालक भिलारे भाऊ, हरिभाऊ मगर, भागवत पिसे, भीमराव साळुंखे, हनुमंत पिसे तसेच माऊली सुळ, शंकर सहकारी चे माजी संचालक केशव पाटील, विलास फडतरे, प्रशांत दोशी, प्रताप सालगुडे, नारायण सालगुडे तसेच सर्व ग्रा. सरपंच, सदस्य, शेतकरी, सभासद, सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, इतर पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
