माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पठाणवस्ती सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सन्मान सोहळा….

पठाणवस्ती (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ दादासाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पठाणवस्ती येथील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचा कार्यक्रम रविवार दि. 12/03/2023 रोजी सायंकाळी 6 वाजता पठाणवस्ती, ता. माळशिरस येथे समस्त ग्रामस्थ पठाणवस्ती यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला आहे.

सदरच्या कार्यक्रमास सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे माजी चेअरमन राजसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार रामभाऊ सातपुते, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील, सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासह तालुक्यातील माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच एजाज फैजखान पठाण, बिनविरोध उपसरपंच अमीर शौकत शेख, ग्रामपंचायत सदस्य इम्तियाज बशीरखान पठाण, जयश्री बिरुदेव कनप, शितल दत्तात्रय पवार, मुमताज मुबारक पठाण, केसर विलास सरतापे, अशोक रामा सोनवणे, तानाजी केशव सूळ, वनिता दिलीप शेटे यांचा सत्कार होणार आहे. तरी सदरच्या भव्य नागरी सत्कार समारंभ व स्नेहभोजनास वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ पठाणवस्ती यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची रस्त्यांच्या कामात दमदार कामगिरी…
Next articleसरकारने कांदा उत्पादकांची घोर निराशा केली – कुबेर जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here