मोहिते पाटील परिवाराने सदाशिवनगर ते शिखर शिंगणापूर शंभू महादेवाला पायी वारी करून पूजा व अभिषेक करून साखरेचा नैवेद्य अर्पण केला.

सदाशिवनगर ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील व सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील उभय पती-पत्नी यांनी शंभू महादेवाची विधीवत पूजा करून दुग्ध अभिषेक करून श्री शंकर साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामातील पहिल्या साखरेचा महानैवेद्य अर्पण केला. यावेळी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती सौ. वैष्णवीदेवी मोहिते-पाटील या मोहिते-पाटील परिवारातील सदस्यांसमवेत संचालिका देवयानी सालगुडे पाटील व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर यंदाच्या वर्षी प्रत्यक्ष गाळपास सुरुवात केल्यानंतर पहिल्या साखरेच्या पोत्याची विधीवत पूजा करून सदर साखरेचा नैवेद्य शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवासाठी मोहिते पाटील परिवारातील सदस्यांनी सदाशिवनगर ते शिंगणापूर अशी पायी वारी करून शंभू महादेवाची पूजा व अभिषेक करून साखरेचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. शिखर शिंगणापूर देवस्थानच्यावतीने मोहिते पाटील परिवारातील दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng