माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचा नेते व कार्यकर्ते पाडवा स्नेहमेळावा संपन्न.

भारतीय जनता पार्टीमधील बुद्रुक, खुर्द खालची वरची आळीसह मित्र पक्षांची स्नेह मेळाव्यामध्ये आवर्जून उपस्थिती.

नातेपुते येथे गुरु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या प्रचार सभेचे पुनरावृत्ती शिष्य आमदार राम सातपुते यांनी दीपावली पाडवा स्नेहमेळावा रूपाने करून दिली

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते ता. माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भाजपा राष्ट्रीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा नेते व कार्यकर्ते दीपावली पाडवा स्नेहमेळावा दीपावलीनिमित्त शुक्रवार दि. 05/11/2021 रोजी सायंकाळी 7 वा. नातेपुते येथील मधुर मिलन मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.

सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीमधील भाजपचे बुद्रुक, खुर्द, खालची वरची आळी यांच्यासह मित्र पक्षातील नेते व कार्यकर्ते यांची स्नेह मेळाव्यामध्ये खास आवर्जून उपस्थिती होती. त्यामुळे माळशिरस विधानसभेच्या वेळी नातेपुते येथे तत्कालीन मुख्यमंत्री व आमदार राम सातपुते यांचे गुरु देवेंद्रजी फडवणीस यांची विधानसभेच्या प्रचार सभेच्या वेळी सर्व गट-तट विसरून भाजपचे व मित्र पक्षाचे नेते एकत्र आलेले होते. त्याचीच पुनरावृत्ती शिष्य आमदार राम सातपुते यांनी दिपावली पाडव्या स्नेहमेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित साजरा करतानाच आठवण करून दिलेली आहे.नातेपुते येथे भव्य व्यासपीठ उभारून प्रशस्त जागेत बसण्याची बैठक व्यवस्था करून पाडवा स्नेह मेळावा संपन्न झाला. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, भाजपचे जिल्हा सहप्रभारी ज्येष्ठ नेते के.के. पाटील, महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव नारनवर, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती सौ. शोभाताई साठे, जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सदस्या संगीताताई मोटे, मंगलताई वाघमोडे, रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एन. के. साळवे, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन नितीनराजे निंबाळकर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, ओबीसी माजी अध्यक्ष बाळासाहेब वावरे, नातेपुतेचे माजी सरपंच बी. वाय. राऊत, ज्येष्ठ नेते दादासाहेब उराडे, हनुमंतराव घालपे, टायगर ग्रुपचे राज्य उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर, भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, रासपचे प्रभारी रणजीत सूळ, तालुकाध्यक्ष वैजिनाथ पालवे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नरेंद्र भोसले, युवा नेते महेश इंगळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, डॉ. समीर बंडगर, उद्योजक दत्तात्रय शेळके, राजाराम मगर पाटील पेट्रोलियमचे लक्ष्मणराव मगर पाटील, माळशिरस तालुका पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार युवा विधीतज्ञ ॲड. जे. पी. कदम, खुडूसचे माजी उपसरपंच व भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाजीनाना सारगर, भैय्या चांगण, अभीकाका देवकाते, संजय उराडे, समाधान भोसले, सुग्रीव निंबाळकर, नागेश वाघमोडे, भाजपचे अकलुज शहराध्यक्ष महादेव कावळे, राहुल मदने, पैलवान राहुल लवटे, दीपक काटे, शरद मदने, डॉ. अक्षय वायकर, डॉ. गोरड, विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे आदी मान्यवरांसह माळशिरस तालुक्यातील आजी माजी पंचायत समिती सदस्य, कारखाना, शिवामृत संघ, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, सुतगिरणी, कुकुटपालन यांचे आजी-माजी संचालक, विविध सेवा सोसायटीचे आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, विविध गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, समाजातील प्रतिष्ठित डॉक्टर, इंजिनीयर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, शेतकरी बांधव, भारतीय जनता पार्टीचे गावोगावचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार राम सातपुते माळशिरस विधानसभेचे आमदार झाल्यानंतर गेल्यावर्षी कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलेले असल्याने दीपावली व इतर सण जनतेला साजरे करता आलेले नव्हते. सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण झालेले असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. यामुळे यंदाचा दिवाळी सण उत्साहात सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षातील नेते व कार्यकर्ते यांचा एकत्रित कार्यक्रम दीपावली पाडव्यानिमित्त आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या आमदारांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भव्यदिव्य स्नेहमेळावा आयोजित करून सर्व उपस्थितांना स्नेह भोजन दिलेले आहे. आमदार राम सातपुते यांचे कोरोना कालावधीत लग्न झालेले होते. त्यांची इच्छा संपूर्ण माळशिरस तालुक्यातील जनतेच्या उपस्थितीत लग्न करण्याची होती. मात्र कोरोना परिस्थिती आडवी आल्याने त्यांनी सदरचे लग्न पुणे येथे केले होते.

आमदार राम सातपुते व सौ. संस्कृती सातपुते यांचा सन्मान व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला. दोघांना एकाच हारामध्ये गुंफलेले असल्याने राम व संस्कृती यांच्या लग्नाच्या आठवणीला उजाळा देण्यात आला. सदर स्नेह मेळावा कार्यक्रमावेळी मदनसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, के. के. पाटील, एन. के. साळवे, महेश इंगळे, यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संयोजक आमदार राम सातपुते यांनी आपले विचार व्यक्त करून उपस्थित सर्वांचे आभार मानून स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्याची विनंती केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी शंभू महादेवाला अभिषेक करून शंकर कारखान्याच्या साखरेचा नैवेद्य दाखविला.
Next articleराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here