माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मान.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या आमदार फंडातून अमृतमहोत्सवी समारंभानिमित्त विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा.

क्रीडाशिक्षक शिवाजी हूंबे यांच्या अमृतमहोत्सवी समारंभास ज्यांनी घडवलं त्या मातोश्री पुतळाबाई व ज्यांना घडवलं असे मोहळचे आ. यशवंततात्या माने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती.


माळशिरस ( बारामती झटका )

हनुमानवाडी तालुका माळशिरस गावचे थोर पुरुष वालचंद विद्यालय कळंब तालुका इंदापूर येथील सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक शिवाजी बाळू हुंबे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माडा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान होणार आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार यांच्या आमदार फंडातून हनुमान वाडी ग्रामपंचायत मधील विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. क्रीडाशिक्षक शिवाजी हुंबे यांना घडविणाऱ्या मातोश्री पुतळाबाई हुंबे, आयुष्याला ज्यांच्यामुळे कलाटणी मिळाली असे गुरुवर्य बी .डी. पाटील ज्यांना शालेय जीवनात खेळातील डाव शिकवलं त्यांनी राजकीय खेळातील गावगाड्यातील डावामध्ये सुद्धा यश संपादन केले असे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत तात्या माने यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित अमृत महोत्सवी सोहळा हनुमानवाडी ( डोंबाळवाडी ) तालुका माळशिरस येथे रविवार दिनांक 02/01/ 20 22 रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे.
हनुमानवाडी-डोंबाळवाडी येथील बाळू हुंबे व पुतळाबाई हुंबे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये शिवाजी हुंबे यांचा 02/03/ 1946 रोजी जन्म झालेला आहे आहे. मटका त्यांना तीन बंधू केशव ,छगन ,ज्ञानदेव व तीन बहिणी पद्मिनी, कस्‍तुराबाई, मंगल प्रतिकूल परस्थिती घरची गरिबी अशा कठीण परिस्थितीतून शिवाजी यांनी चंद्रपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतले. माळीनगर येथील मॉडेल विविधांगी प्रशाला येथे आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले. शिंदेवाडी येथील हनुमान विद्यालय प्रशाला येथे अकरावी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतले. पुणे येथे सी.पी. एड (सर्टिफिकेट फिजिकल एज्युकेशन ) शिक्षकांना शिक्षण पूर्ण केले. 1968 साली कुर्बावी येथील रामलिंग विद्यालयाच्या अंतर्गत रत्नप्रभादेवी विद्यार्थी वस्तीगृह येथे अधीक्षक म्हणून दोन वर्ष नोकरी केली. वस्तीगृहात नोकरीस असताना 13 जून 1968 साली वडापुरी तालुका इंदापूर येथील कमल फरतडे यांच्याशी विवाह झाला आणि वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली. 1970 साली घरातील कौटुंबिक अडचणी असल्याने वस्तीगृहातील नोकरी सोडून गावाकडे शेती गुरेढोरे मेंढरे असा व्यवसाय सुरू केला. 1972 साली श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर कारखान्याच्या माध्यमातून लिफ्ट इरिगेशन सुरू करण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील समाज भूषण नानासाहेब देशमुख आणि ज्येष्ठ नेते बी डी पाटील तत्कालीन संचालक श्री शंकर सहकारी साखर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला होता सदर कार्यक्रमास शिवाजी हुंबे गेलेले होते. बी डी पाटील यांनी शिवाजी हुंबे यांना आपण सध्या काय करता असे विचारले आणि संपूर्ण माहिती घेऊन उद्या वालचंद विद्यालय कळंब येथे भेटण्यासाठी या असे सांगितल्यानंतर शिवाजी हुंबे वालचंद विद्यालय येथे गेल्यानंतर बी डी पाटील यांनी क्रीडा प्रशिक्षक म्हणून 1972 साली नोकरी दिली आणि तेथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.


क्रीडा प्रशिक्षक शिक्षक म्हणून शिवाजी हुंबे यांनी अनेक विद्यार्थी खेळामध्ये घडवलेली आहेत 1983 मध्ये विद्यालयाचा पहिला विद्यार्थी नॅशनल कुस्ती मध्ये दैदिप्यमान यश मिळवलेले होते. 1993 साली राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धा गुलबर्गा येथे झालेल्या होत्या सदर स्पर्धेचे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वालचंद विद्यालय कळंब यांनी केलेले होते त्यामध्ये चार विद्यार्थिनी खेळलेल्या होत्या त्यावेळेस राष्ट्रीय पातळीवरील तिसरे बक्षीस पटकावले होते. असे अनेक विद्यार्थी त्यांनी आपल्या क्रीडा शिक्षक असताना घडवलेले आहे विद्यार्थीदशेत उत्कृष्ट खेळाडू असणारे सध्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यशवंत तात्या माने हे सुद्धा विद्यार्थीच आहेत. असे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत 2003 साली वालचंद विद्यालय कळंब येथून सेवानिवृत्त झालेले आहेत.
नोकरी सुरू असताना सुद्धा गावाकडच्या विकास कामात नेहमी लक्ष ठेवून असत 1993 साली डोंबळवाडी ग्रामपंचायत मधून हनुमान वाडी ग्रामपंचायत विभक्त करण्यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. हनुमान वाडी गावाच्या विकासासाठी व समाज उपयोगी कार्यामधून हुंबे परिवार यांनी लोकप्रियता गावात वाढवलेली होती 2018साली थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच पदी सुनबाई सौ सुरेखा विनोद हुंबे यांना सरपंच पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. गावांमध्ये अनेक विकास कामे केलेली आहेत 14 वा वित्त आयोग आणि सध्या 15 वा वित्त आयोग यामधून कामे सुरू आहेत माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार आमदार राम सातपुते यांच्या आमदार फंडातून हायमास्ट दिवा व आरो प्लांट अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उद्घाटन समारंभ ठेवलेला आहे. वयोमानानुसार शिवाजी हुंबे यांना शारीरिक त्रास झालेलं होतं किडनीच्या आजाराने डायलेसिस सुद्धा केले होते अकलूजचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीकांत देवडीकर यांच्या अथक परिश्रमामुळे जीवदान मिळालेले आहे. सध्या तब्येत ठणठणीत आहे अमृतमहोत्सवी वर्ष गेल्या वर्षीच 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत मात्र कोरून संसर्ग रोगाचा फैलाव असल्याने गेल्या वर्षी अमृतमहोत्सवी साजरा करता आलेला नाही या वर्षी हुंबे परिवार यांनी अमृतमहोत्सवी साजरा करीत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या मातोश्री पुतळाबाई यांना मुलाचा अमृत महोत्सवी सोहळा पाहता येणार आहे त्यांचे तीन बंधू केशव, छगन ,ज्ञानदेव, व एक बहीण पुतळाबाई सध्या हयात नाहीत वडिलांची सुद्धा 2013 साली दुःखद निधन झालेली आहे.
अमृतमहोत्सवी समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर अनेक आजी-माजी विद्यार्थी नातेवाईक मित्रपरिवार डोंबाळवाडी व हनुमानवाडी पंचक्रोशीतील नागरिक व समस्त ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी कार्यक्रमास यावे असे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक यांचे नातू युवा नेते शिवेंद्र हुबे आणि हुबे परिवार यांच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी निवडीत निकषांचा बोजवारा.
Next articleENEX File Extension What is enex and how to open?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here