माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीने देशमुख परिवारांच्या ” स्वप्नपूर्ती ” बंगल्याची ‘ इच्छापूर्ती ” झाली.

” स्वप्नपूर्ती ” वास्तुच्या वास्तुशांती, गृहप्रवेश व सत्यनारायण पूजेस विजयसिंह मोहिते पाटील, हनुमंतराव देशमुख, डॉक्टर रामदास देशमुख, प्रतापराव पाटील, गौतमआबा माने, दत्तूकाका रणवरे, गणपतराव वाघमोडे, मानसिंग मोहिते, शंकरनाना देशमुख, अमरसिंह माने देशमुख अनेक मान्यवरांची उपस्थिती.

इस्लामपूर ( बारामती झटका )

इस्लामपूर ता. माळशिरस गावचे माजी पोलीस पाटील तुकाराम शंकरराव देशमुख, यांचे चिरंजीव गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर युवराज तुकाराम देशमुख यांनी नव्याने बांधलेल्या स्वप्नपूर्ती या वास्तूचा वास्तुशांती गृहप्रवेश व सत्यनारायण पूजा समारंभ शुक्रवार दिनांक 31 /12/ 20 21 रोजी सकाळी 11 वाजता विधीवत, होम हवन करून मंगलमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला सदर स्वप्नपूर्ती वास्तुशांतीच्या कार्यक्रमास खास आवर्जून उपस्थित असलेले माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील उर्फ विजयदादा यांच्या उपस्थितीने देशमुख परिवारांची इच्छापूर्ती झालेली आहे.

देशमुख परिवार यांच्यावतीने विजय दादा यांचा सन्मान करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमास विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतराव देशमुख, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर रामदास देशमुख, ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे,माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव उर्फ आबू पाटील, पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने, मानसिंग मोहिते, अजय सकट, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तूकाका रणनवरे, ह.भ.प. धैर्यशीलभाऊ देशमुख, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख,महादेव देवालय ट्रस्ट वेळापूरचे अध्यक्ष अमरसिंह माने देशमुख,शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक सचिन रणनवरे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, कोंडबावीचे सरपंच विष्णुपंत घाडगे, दहीगावचे सरपंच रणधीर पाटील, कन्हेरचे सरपंच पोपट माने , इस्लामपूर चे सरपंच शिवाजी बर्वे, मोरोचीचे माजी उपसरपंच माऊली सुळ पाटील, चौंडेश्वरवाडी चे बाळासाहेब देशमुख, संताजी देशमुख, टणूचे गुलाब मोहिते ,समीर मोहिते, तांबवे गावचे संभाजी इनामदार प्रशांत इनामदार, सवतगव्हाणचे विराज निंबाळकर, यशराज नितीनराजे निंबाळकर,इस्लामपूर चे कैलास पवार धनंजय देशमुख,अर्जुन पवार दिलीप पवार, ज्येष्ठ नेते विलास निंबाळकर, संतोष शिंदे, संजय सावंत, दादासो वाघमोडे, माळशिरस पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अशोकराव रणनवरे, शाखा अभियंता आर एस रणनवरे, इस्माईल मुलानी, विजय भूमकर, सोलापूर जिल्हा परिषद जिल्हा जलसंधारण अधिकारी पी.बी. भोसले, शाखा अभियंता आगवणे पारसे ,चौगुले, माळशिरस पंचायत समितीचे कक्ष अधिकारी महेंद्र बुगड, ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे, एम.डी. देशमुख, आर. बी .काळे, हनुमंत वगरे, पांडुरंग दुधाळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संतोष देशमुख, ज्ञानदेव जानकर, महेबुब शेख, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महेश माने, अभिनंदन देशमाने, सुशील पताळे, शिवराज निंबाळकर, हुसेन वसान आदींसह परिसरातील आजी माजी सरपंच विविध गावचे राजकीय- सामाजिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी, मित्र परिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर स्वप्नपूर्ती बंगल्याचे प्लॅन व नियंत्रण पाटील कन्स्ट्रक्शन माळशिरस चे अमोल अशोक पाटील यांनी केलेले आहे उपस्थित सर्वांनी बांधकामाचे व अंतर्गत इंटिरियर पाहिल्यानंतर प्लेन देणारे यांचे कौतुक केले तरी आपली ही स्वप्नपूर्ती पूर्ण करण्याकरता पाटील कन्स्ट्रक्शन चे अमोल अशोकराव पाटील यांच्याशी संपर्क साधण्याकरता 94 23 32 80 77 या नंबर वर संपर्क साधावा.

स्वप्नपूर्ती वास्तूच्या वास्तुशांती गृहप्रवेश व सत्यनारायण पूजेचे येणाऱ्या सर्व आप्त इष्ट मित्र परिवार नातेवाईक यांचे सौ सुरेखा श्री तुकाराम शंकरराव देशमुख, सौ सुषमा श्री युवराज तुकाराम देशमुख, सौ साधना श्री रविराज तुकाराम देशमुख यांच्या वतीने आलेल्यांचे स्वागत करून स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्याची विनंती करण्यात येत होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मान.
Next articleरजिस्टर विवाह करीत ठेवला समाजापुढे आदर्श विवाहाचा खर्च “नाम फाउंडेशन” च्या सामाजिक कार्यास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here