नातेपुते ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील उर्फ विजयदादा यांनी माळशिरस पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, समाज भूषण नानासाहेब देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विलास आद्रक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माळशिरस पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांचा दि. 2 जानेवारी रोजी वाढदिवस असतो. त्यांना नातेपुते पंचक्रोशीमधून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. नातेपुते येथील समाजभूषण राजेंद्र पाटील यांचे माऊली पाटील पुतणे आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng