माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओंकार मंगल कार्यालयाचा उद्घाटन समारंभ.

डॉ. एम के इनामदार, डॉ. बापूराव ओव्हाळ, मुख्याध्यापक दिलीप मिसाळ, यांच्यासह माळशिरस नातेपुते महाळुंग श्रीपुर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांचा सत्कार संपन्न होणार.

वेळापूर ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओंकार मंगल कार्यालय नाथ मंदिर जवळ वेळापूर तालुका माळशिरस येथे शुक्रवार दिनांक 4/3/ 20 22 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमास अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, भाजपचे जिल्‍हा संघटन व सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, अकलुज ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती संग्रामसिंह जहागीरदार, पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदर कार्यक्रमात सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ,डॉक्टर एम के इनामदार, वेळापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबुराव ओव्हाळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप विठ्ठल मिसाळ, यांच्यासह माळशिरस, नातेपुते, महाळुंग श्रीपुर नगरपंचायत चे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सहकार महर्षी कारखान्याचे संचालक शंकरराव माने देशमुख , अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, नातेपुतेचे माजी सरपंच विद्यमान नगरसेवक एडवोकेट भानुदास राऊत, भाजपचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदराव माने देशमुख, युवा नेते ओंकार माने देशमुख, प्रगतशील बागायतदार एडवोकेट लक्ष्मण मगर, भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शंकरराव काकुळे, कोळेगावचे माजी उपसरपंच धनंजय दुपडे, बोंडलेचे सरपंच विजयसिंह माने देशमुख,बोंडलेचे माजी सरपंच मधुकर जाधव, प्रगतशील बागातदार श्रीकांतकाका देशमुख, उघडेवाडी चे माजी सरपंच अजितराव माने देशमुख, सहकार महर्षी साखर कारखान्याचे माजी संचालक महादेवभाऊ चव्हाण, पिसेवाडी चे माजी सरपंच सुरेश पिसे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीशराव दिगंबर माने देशमुख, प्रकाशराव दिगंबर माने देशमुख, रणजीत विजयकुमार माने देशमुख, एडवोकेट रणजित नानासाहेब माने देशमुख, अमरसिंह विजयकुमार माने देशमुख यांच्या वतीने नम्र आवाहन केले आहे नजरचुकीने पत्रिका अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे माने देशमुख यांच्या वतीने नम्र आवाहन आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी विकास बबनदादा बोडके तर व्हॉइस चेअरमन पदी शालन मोहन गायकवाड यांची बिनविरोध निवड.
Next articleखासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहिण्याचा कोणालाही अधिकार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here