मोहिते-पाटील परिवार व विविध संस्थेच्यावतीने रोख पाच लाख रूपये बक्षीस देऊन गुणगौरव
अकलूज ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील व सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील या उभय पती-पत्नींच्या शुभहस्ते उपमहाराष्ट्र केसरी पैलवान विशाल उर्फ प्रकाश बनकर यांना पाच लाख रुपये बक्षीस भेट देऊन हार व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, सौ. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉटर्स मॉम्स फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील आदी मोहिते पाटील परिवारासह शिवरत्न कुस्ती केंद्र व ताराराणी कुस्ती केंद्राचे कोच व मल्ल उपस्थित होते.
सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये माळशिरस तालुक्यातील मांडवे सदाशिवनगर गावचा पैलवान विशाल उर्फ प्रकाश बनकर याची माती गटातून नामांकित मल्ल सिकंदर शेख याच्यावर मात करून महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी निवड झालेली होती.
माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील पैलवानाने महाराष्ट्र केसरी कुस्ती पर्यंत मजल मारल्यानंतर विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व शिवरत्न कुस्ती केंद्राचे सर्वेसर्वा भाजपचे नेते धैर्यशिल मोहिते पाटील यांनी त्यांना तीन लाख रूपयाचे पारितोषक जाहीर केले होते. महाराष्ट्र केसरीची गदा माळशिरस तालुक्याला येईल अशी अपेक्षा होती.

उपमहाराष्ट्र केसरी झालेल्या विशाल उर्फ प्रकाश बनकर यांच्या कामगिरीचे पारीतोषक व सन्मान मोहिते पाटील परीवार, ताराराणी कुस्ती केंद्रा, शिवरत्न कुस्ती केंद्र यांच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील व सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील या उभय पती पत्नी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
समस्त मोहिते पाटील परीवार, ताराराणी कुस्ती केंद्र, शिवरत्न कुस्ती केंद्र, शिवामृत दूध उत्पादक संघ, शिवरत्न शिक्षण संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, शिक्षण प्रसारक मंडळ, संग्रामसिंह मित्र मंडळ, महर्षी जिमखाना, विजयसिंह मोहिते पाटील वाहतूक संघ, रत्नप्रभादेवी बीज उत्पादक संघ अशा विविध संस्थाच्या वतीने रोख रक्कम रुपये पाच लाख देण्यात आले.
गेली दोन वर्ष कोरोना परिस्थिती असल्याने अनेक ठिकाणी मैदाने यात्रा-जत्रा बंद होत्या. पै. प्रकाश बनकर यांची परिस्थिती बेताची होती. अशा कठीण परिस्थितीत पै. प्रकाश बनकर याची महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी निवड झाली, ही अभिमानाची गोष्ट आहे. मोहिते पाटील परिवाराने दिलेला आधार निश्चितपणे पै. प्रकाश बनकर यांच्या अडचणीच्या काळात मिळालेली रसद भविष्यात सराव व प्रॅक्टिस करण्याकरता प्रीती पाटील परिवारांची आर्थिक रसद प्रेरणा देणारी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng