अकलूज ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथील हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या दवाखान्यामध्ये हृदय विकाराचा सौम्य झटका आलेले माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे आणि शिवदास कुंभार यांचे ऋणानुबंधाचे संबंध होते. मोहिते पाटील आणि कुंभार परिवार यांचे सलोख्याचे संबंध आहेत. ही दोन्ही कुटुंबे नेहमी एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी असतात. मोहिते पाटील घराण्याशी एकनिष्ठ असणारे चंद्रकांत कुंभार यांना काही दिवसापूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आलेला होता. त्यांच्यावर डॉ. एम. के. इनामदार यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
चंद्रकांत कुंभार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरिता विजयदादांनी आवर्जून अश्विनी हॉस्पिटल येथे भेट दिलेली होती. सध्या चंद्रकांत कुंभार यांची तब्येत स्थिर असून काही काळजी करण्याचे कारण नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng