माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शुभहस्ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन व थेट संपर्कासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाईन सेंटर कार्यालयाचा शुभारंभ.

शेतकऱ्यांचे आधारस्तंभ राजू शेट्टी यांच्याशी तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या थेट संपर्क हेल्पलाइनमुळे शेतकऱ्यांचा अजित बोरकर त्यांच्याशी थेट सुसंवाद

अकलूज ( बारामती झटका )

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शुभहस्ते माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व थेट संपर्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन सेंटर कार्यालयाचा शुभारंभ रविवार दि. 5/12/2021 रोजी दु. ३ वा. करण्यात आला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष अमरसिंह कदम, जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल, जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक शहाजानभाई शेख, राज्यप्रवक्ता रणजित बागल, प्रसिध्दी प्रमुख श्रीनिवास कदम पाटील, ज्येष्ठ नेते मगन काळे, डॉ. सचिन शेंडगे, अमरसिंह इंगळे, उद्योजक अजित ज्ञानोबा बोरकर, मोतीराम पवार, किरण लोखंडे, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड, समाधान काळे, सचिन बोरकर, स्वप्निल बोरकर, दादासाहेब वाघंबरे, आदि मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागात हेल्पलाईन सेंटर कार्यालयाची पहिल्यांदाच सुरुवात केलेली असल्याने शेतकऱ्यांना थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी सोडवून घेण्यासाठी मदत होणार असल्याने तालुकाध्यक्ष अजित भैय्या बोरकर यांचा स्तुत्य उपक्रम आहे.

आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधता येणार असल्यामुळे फायदा होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पूर्ण ताकतीने निवडणुका लढवाव्यात, खंबीरपणे पाठीशी उभा असल्याचे मत शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत तोफांची सलामी देऊन व हलगीच्या निनादात करण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी यांचा सन्मान माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाईन सेंटरला माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील, राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ पाटील, बाजीराव माने, युवा नेते शिवराज पुकळे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे, युवा उद्योजक विकास देशमुख, युवा उद्योजक अतुल पिसे आदी मान्यवरांनी हेल्पलाईन सेंटरच्या संपर्क कार्यालयास भेटी दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपासक विनोद व उपासिक करिष्मा यांचा मंगल परिणय पर्यावरणाचा समतोल राखून संपन्न झाला.
Next articleअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त फळबागा व पिकांचे पंचनामे करा – हर्षवर्धन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here