माजी नगरसेवक संतोषआबा वाघमोडे यांनी प्रभाग क्र. १४ चा गड कायम राखला.

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत होलार समाजाच्या महिला हमालाच्या पत्नीने केली धमाल.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संतोषआबा वाघमोडे यांनी प्रभाग क्रमांक १४ च्या अपक्ष उमेदवार सौ. मंगल जगनाथ गेजगे यांना निवडून आणून गड कायम राखला आहे. सोलापूर जिल्ह्यात संतोषआबा वाघमोडे यांच्या सहकार्याने होलार समाजाच्या महिला माळशिरस नगरपंचायतमध्ये गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे जगन्नाथ गेजगे हमाली करीत असतात, या अटीतटीच्या निवडणुकीत धमाल केलेली पहावयास मिळत आहे.

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये गतवेळेस प्रभाग क्रमांक १४ मध्ये अपक्ष नगरसेवक संतोषआबा वाघमोडे निवडून आलेले होते. त्यांनी प्रभागामधील जनतेची इमानेइतबारे सेवा केलेली होती. लोकांच्या अडचणी व मदतीला वेळोवेळी ते धावून गेले होते. प्रभागामधील अनेक प्रलंबित कामे केलेली होती. नगरपंचायत निवडणुकीच्या आरक्षणामध्ये प्रभाग क्रमांक १४ अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला होता. तरीसुद्धा संतोषआबा वाघमोडे यांनी प्रभाग आरक्षित असतानासुद्धा जनतेची कामे करण्याचे सुरूच होते. वेळोवेळी सहकार्य करत होते. त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या, उमेदवाराविषयी चाचपणी केली. त्यावेळेस हमाली करून उदरनिर्वाह करणारे जगन्नाथ गेजगे यांच्या पत्नी मंगल गेजगे यांना उमेदवारी देण्याचे ठरले.

संतोष आबा वाघमोडे यांनी प्रभागामध्ये आजपर्यंत केलेल्या विकास कामामुळे व जनतेशी संपर्क ठेवून सुख दुःखा मध्ये सहभाग घेतलेला होता. त्यामुळे त्यांनी दिलेले होलार समाजाचे उमेदवार मंगल जगनाथ गेजगे यांना मतदारांनी निवडून दिले आहे. माळशिरस नगरपंचायतमध्ये व सोलापूर जिल्ह्यात होलार समाजाच्या पहिल्या महिला नगरसेवक होण्याचा बहुमान मंगल गेजगे यांना संतोषआबा वाघमोडे यांच्या सहकार्याने मिळालेला आहे. प्रभागामध्ये लक्ष्मणासारखे असणारे बंधू किंगमेकर तात्यासाहेब वाघमोडे यांच्या सहकार्‍यांसह दिलीप मंजुळे, सोमनाथ सरगर, उत्तम शेगर, अशोक वाघमोडे, बळीराम गेजगे, अमर पठाण, उत्तम पिसे, जालिंदर देवकर, बाळू उबाळे, तानाजी सरगर, सुरेश शिंदे, समीर शेख, बाळासो ढोबळे यांच्यासह वरील सत्काराला उपस्थित असलेले मान्यवर व ज्ञात-अज्ञात संतोषआबा वाघमोडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावान मित्र परिवारांचे सहकार्य लाभलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकाय सांगताय… मेडद ग्रामपंचायतला नाथाआबाच्या रूपाने एकशे तीस किलोचे वजनदार सरपंच.
Next articleअक्कलकोट तालुक्यातील हाजंगी नगरपंचायतच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष तथा दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुका अध्यक्ष नितीन माने यांच्यासह तिघांचा विजय..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here