अकलूज ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या फातीमा पाटावाला यांनी स्वर्गीय हकीम उद्दीन अब्बास अली पाटावाला यांचे दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी स्मृती प्रित्यर्थ सर्वसामान्य जनतेच्या जनहितार्थ उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.
सध्या कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलेले आहे. अशा कठीण परिस्थितीत कोरोना लसीकरण करून प्रतिबंधात्मक उपायोजना सुरू आहेत. अशा बिकट परिस्थितीत लसीकरणासाठी लस उपलब्ध होत आहे. त्या प्रमाणात सिरीजची उपलब्धता होत नसल्याने फतीमा पाटावाला यांनी मानवतेच्या भावनेतून अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरणासाठी लागणाऱ्या 5000 सिरीजेस उपजिल्हा रुग्णालय येथे स्मृतिप्रीत्यर्थ भेट दिल्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. मुकुंद जामदार, डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng