माजी पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांची विठ्ठलराव गोफणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

पिसेवाडी ( बारामती झटका )

महाविकास आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी गोफणेवस्ती, पिसेवाडी येथील श्री. विठ्ठलराव ज्ञानदेव गोफणे यांच्या निवासस्थानी येऊन चि. अक्षय गोफणे व चि. सौ. कां. सुचिता या नवदांपत्यास भविष्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता आवर्जून सदिच्छा भेट दिलेली होती.

सौ. संगीता व श्री. विठ्ठलराव ज्ञानदेव गोफणे रा. गोफणेवस्ती, पिसेवाडी, ता. माळशिरस यांचे द्वितीय चिरंजीव अक्षय आणि सौ. सुमन व श्री. कुबेरराव शेषराव हुलगुंडे पाटील, रा. भिलज ता. जिंतूर, जि. परभणी यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. सुचिता यांचा शुभविवाह स्मृती भवन मंगल कार्यालय यशवंतनगर, अकलूज येथे दि. 20/07/2022 रोजी संपन्न झालेला होता. सदर विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी दत्तामामा भरणे हेही उपस्थित राहणार होते मात्र, मुंबई दौऱ्यामुळे उपस्थित राहता आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी विठ्ठलराव गोफणे यांच्या निवासस्थानी येऊन नवदांपत्यांना शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट दिलेली होती.

श्री.दत्तामामा भरणे यांचा सन्मान गोफणे परिवार यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी श्री‌ विठ्ठलराव गोफणे, सौ. संगीता गोफणे, श्री. दादासाहेब गोफणे, सौ. पुनम गोफणे, श्री. अक्षय गोफणे, सौ. सुचिता गोफणे, सौ. उज्वला गणेश गोफणे – लवटे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. श्रावण राचकर, डिझाईनिंग इंजिनियर सौ. प्रतिभा राचकर, दत्ताभाऊ राचकर यांच्यासह गोफणे व राचकर परिवारातील सदस्य उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleHard anodized cookware Dating — How to Get Started
Next articleभाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा, अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने पारित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here