अहमदनगर ( बारामती झटका )
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषदेवर आमदार पदी पहिल्या पसंतीने निवड झाल्याबद्दल चौंडी येथील निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते सोपानकाका नारनवर, शिवाजीराव वाघमोडे पाटील, भाजपचे माजी ओबीसी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वावरे, भाजपचे सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुक्तारभाई कोरबु व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
युतीच्या सरकारमध्ये प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे मंत्रीपदाचा पदभार असताना माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची अनेक कामे केलेली आहेत.

माळशिरस तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांना विधान परिषदेची संधी दिलेली होती. पहिल्या पसंतीने विजयी झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचा सन्मान माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng