हर्षल घोगरे यांनी यूपीएससी परीक्षेत ६१४ वे स्थान मिळविले
इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
केंद्रीय लोकसेवा आयोगा (यूपीएससी) च्या परिक्षेत देशात ६१४ वे स्थान मिळवून दैदिप्यमान यश संपादन केलेल्या बावडा गावच्या हर्षल भगवान घोगरे यांचा राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती शनिवारी दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सन २०२० च्या परिक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती फेब्रुवारी ते जुलै या दरम्यान घेण्यात आल्या. हर्षल घोगरे यांचे शिक्षण बी.टेक. झाले असून, दिल्ली येथे या परीक्षेचा दोन वर्षे ते अभ्यास करत होते. जिद्द व अभ्यासात सातत्य ठेवत त्यांनी हे यश संपादन केले.

हर्षल घोगरे हे बावडा गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत. हर्षलचे वडील भगवान घोगरे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. देशातील सर्वोच्च परीक्षेत यश मिळवून हर्षल घोगरे यांनी बावडा गावचे नाव उज्वल केले आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार प्रसंगी काढले.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी हर्षल तसेच वडील भगवान घोगरे यांचाही सत्कार करून कौतुक केले. याप्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, किरण पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, सुभाष घोगरे, संचालक डी.एन.मरकड आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng