माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन

इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून

माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेञ निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे प्रसिद्ध श्री लक्ष्मी-नृसिंहाचे शनिवारी (दि.20) दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याहस्ते आरती करण्यात आली.
भीमा व नीरा नदीच्या संगमावरती वसलेले श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर हे दक्षिणेकडील काशी म्हणून ओळखले जाते. मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचा श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्यावतीने अविनाश दंडवते यांनी सत्कार केला. सध्याचे अवकाळी पावसाचे संकट दूर व्हावे व शेतकरी सुखी समाधानी रहावा, असे साकडे श्री नृसिंह चरणी घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी संगितले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे चालू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. यावेळी माजी सरपंच संतोष मोरे, माजी उपसरपंच विलास ताटे-देशमुख, विजय सरवदे, अजय काळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविवाह समारंभामध्ये राजवर्धन पाटील यांच्याकडून घडले आपुलकीचे दर्शन
Next articleशेतकऱ्यांचा नेता रवीकांत तुपकरांची प्रकृती खालावली, शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी पेटवली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here