माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कोरोनातून बरे व्हावे म्हणून समर्थकांचा सिद्धेश्वर मंदिरात अभिषेक

इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे कोरोनातून ठणठणीत बरे व्हावेत, यासाठी त्यांचे समर्थक व मातंग एकता आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे यांनी सोमवारी इंदापूर येथील सिद्धेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालून उत्तम आरोग्यासाठी साकडे घातले आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असले तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार ते आरोग्याची काळजी घेत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी सध्या आपली तब्येत उत्तम असून जनतेनेही आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील केले आहे.

ललेंद्र शिंदे हे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर येथे दरवर्षी लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती घेऊन विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ते आयोजित करत असतात. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रक्तदान शिबिरे, विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून समाजाला मदतीचा हात देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. यावेळी सामाजिक युवा कार्यकर्ते संतोष देवकर व इतर सहकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर व मित्रपरिवार यांचा तिरुपती बालाजी दौरा.
Next articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महास्वच्छता अभियानाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here