रामाच्या राज्यात सर्वसामान्य रुग्णांना दिलासा , ग्रामीण भागातील जनतेला दीपावली भेट.
माळशिरस (बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभ हस्ते व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक एक अकरा 21 रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामीण रुग्णालय माळशिरस येथे लोकार्पण सोहळा विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते व अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या आमदार फंडातून दोन रुग्णवाहिका यांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. आमदार यांच्या नावामध्ये राम असल्याने रामाच्या राज्यात सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार असून माळशिरस परिसरातील ग्रामीण भागातील जनतेला दीपावली भेट दिलेली आहे.
माळशिरस ग्रामीण रुग्णालयांमध्ये अनेक सुख सोयीने रुग्णांची सेवा होत असल्याने दिवसेंदिवस ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे ग्रामीण भागातून सर्वसामान्य व गोरगरीब सिरीयस व अपघात ग्रस्त रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी अडचण येत होती माळशिरस व पिलीव परिसरातील लोकांनी विकास रत्न विजयसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांना ग्रामीण भागातील रुग्णांच्या अडचणी वेळोवेळी सांगितलेल्या होत्या लोकांची अडचण लक्षात घेऊन आमदार फंडातून दोन रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय येथे देण्यात येणार आहेत. माळशिरस ग्रामीण रुग्णालय व पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन्ही ठिकाणच्या अडचणी दूर करण्याकरता रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे तरी सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng