कर्तव्यदक्ष विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा सन्मान लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी केला.
माळशिरस ( बारामती झटका )
‘महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये सोलापूर व अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्यावतीने सन्मान केला.
भारतीय जनता पक्षाची मुंबई येथे प्रमुख कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. यामध्ये प्रमुख नेत्यांकडे दोन जिल्हे निवडणूक प्रभारी म्हणून देण्यात आले. त्यामध्ये देवेंद्रजी फडवणीस ज्यांच्याकडे सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांची निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे.
आगामी काळात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक प्रभारी म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जबाबदारी दिलेली असल्याने सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला आहे. सोलापुर जिल्ह्यात खासदार व आमदार भाजपचे आहेत. भविष्यात आजुन आमदारांची संख्या वाढू शकते, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांची ताकद देवेंद्रजी फडवणीस यांच्यामुळे वाढणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng