पुणे (बारामती झटका)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रांत पोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग यांच्याकडून महामहीम माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना जीवनगौरव व राजमाता जिजाऊ स्रीशक्ती पुरस्कार पोलीस मित्र संघाच्यावतीने नुकताच माजी राष्ट्रपतीच्या पुणे येथील निवास्थानी प्रत्यक्ष भेटून प्रदान करण्यात आला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी मोठ्या आस्थेने प्रांत पोलीस मित्र संघाचे कामकाज व कार्यपद्धती जाणून घेतली.
याप्रसंगी गोपालजी बिहारी-राष्ट्रीय अध्यक्ष, प्रांत मित्र पोलिस संघ, प्रशांतजी कुळकर्णी कार्याध्यक्ष पूणे जिल्हा प्रांत पोलीस मित्र संघ, नितिनजी चिंचवडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रांत पोलिस मित्र संघ, कायदेविषयक सल्लागार ॲड. पियाली घोष, ॲड. निलिमा चव्हाण,ॲड. अनिषा फणसळकर व सर्व प्रांत पोलिस मित्र संघ यांच्या उपस्थितीत दिमाखात व कौटुंबिक वातावरणात हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng