पंचायत समिती सदस्य धनराजदादा शिंदे यांच्या शुभहस्ते पडसाळी येथे कार्यक्रम संपन्न.
माढा ( बारामती झटका )
माढा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार दि. २३/९/२०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग माढा तालुक्याच्या वतीने, मौजे पडसाळी येथे सेतू कार्यालयातील सर्व दाखले ऑनलाइन काढण्याचा कॅम्प माढा तालुका अध्यक्ष श्री. अमोल कांबळे व सरपंच श्री. डॉ. प्रविणदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे पडसाळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सेतू कार्यालयातील सर्व दाखले मोफत काढण्याचा कॅम्प ठेवण्यात आला आहे.

सदर सेतू कार्यालयाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य युवानेते श्री. धनराजदादा शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सामाजिक न्यायचे जिल्हा चिटणीस श्री. संतोष सरवदे, उपसरपंच श्री. भारत देशमुख, शिवराज पाटील, शैलेश पाटील, सचिन रवीशंकर पाटील, राज पाटील, सदाशिव फरड चेअरमन, शंभू मुटकुळे, दशरथ मुटकुळे, शंकर भुजबळ, Rpi शाखा अध्यक्ष श्री. प्रविण जानराव, महेश नायकुडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सेतू कार्यालयांमध्ये दिवसभर सर्व दाखले ऑनलाईन काढण्याचे काम सुरू होते. अनेक नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतलेला आहे. पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग व ग्रामपंचायत पडसाळी यांनी स्तुत्य उपक्रम घेतलेला असल्याबद्दल युवानेते धनराजदादा शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शिंदे परिवारांवतीने शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng