माढा तालुक्यातील 59 गावांना 15 व्या वित्त आयोगातून 2 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर – रणजितभैय्या शिंदे

माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड यांजकडून

शासनाच्या 15 व्या वित्त आयोगातून बंधित व अबंधित या दोन प्रकारच्या अनुदान गटातून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून माढा तालुक्यातील विविध 59 गावांसाठी 2 कोटी 23 लाख 65 हजार निधी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दि. 31 मार्च 22 रोजीच्या पत्रानुसार मंजूर झाला असून त्यामध्ये मानेगाव गटातील 10 गावांसाठी 41 लाख 50 हजार निधीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांनी दिली आहे.

या निधीतून शाळा डिजिटल करणे, शेड बसवणे, पाण्याची टाकी व हौद बांधणे, पाणीपुरवठा पाईपलाईन करणे, भूमिगत गटार करणे, हातपंप बसवणे, आर.ओ.फिल्टर बसवणे, ड्यूअल पंप बसविणे, स्ट्रीट लाईट व पथदिवे बसवणे, घंटा गाडी खरेदी करणे, सार्वजनिक मुतारी व शोषखड्डे बांधणे, स्मशानभूमी व दफनभूमी बांधणे, त्याभोवती वॉल कंपाऊंड करणे, स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते मजबुतीकरण करणे, स्मशानभूमी परिसरात सिमेंट काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करणे, शिव रस्ते व वस्त्यांकडे जाणारे रस्ते खडीकरण व मजबुतीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे, विविध ठिकाणच्या मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे आदी कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.

हा निधी मंजूर झालेल्या गावांमध्ये कापसेवाडी 5 लाख, सुलतानपूर 5 लाख, वडाचीवाडी (अं.उ.) 3.5 लाख, खैराव 3.5 लाख, कुंभेज 3.5 लाख, लोंढेवाडी 4.6 लाख, खैरेवाडी 4.5 लाख, पापनस 7.50 लाख, तांदुळवाडी 3.54 लाख, रिधोरे 90 हजार, जाधववाडी (मा.) 2 लाख, उपळाई बुद्रुक 3.5 लाख, उपळाई खुर्द 5 लाख, अंजनगाव खेलोबा 3 लाख दोन हजार, चिंचोली 2 लाख, बावी 1.25 लाख, रणदिवेवाडी 3 लाख, वेताळवाडी 2 लाख दोन हजार, मुंगशी 1 लाख, बारलोणी 2 लाख 75 हजार, म्हैसगाव 23 लाख 69 हजार, भोसरे 2.14 लाख, रोपळे 2 लाख, कवे 2.50 लाख, लव्हे 2 लाख, चिंचगाव 2 लाख, अरण 10 लाख, मोडनिंब 2.70 लाख, तुळशी 2.70 लाख, परितेवाडी 1.70 लाख, जाधववाडी (मो.) 70 हजार, बैरागवाडी 70 हजार, वरवडे 1.70 लाख, उजनी  70 हजार, लऊळ 2.20 लाख, चव्हाणवाडी 1 लाख, घोटी 1 लाख, बेंबळे 7 लाख, माळेगाव 3.70 लाख, आहेरगाव 2 लाख 9 हजार, अकुंबे 2.25 लाख, मिटकलवाडी 3 लाख, सापटणे (टें.) 5 लाख, पिंपळनेर 5 लाख, तांबवे 2.50 लाख, आढेगाव 1.40 लाख, चांदज 13.50 लाख, गारअकोले 1.20 लाख, आलेगाव बुद्रुक 1.20 लाख, टाकळी (टें.) 5.90 लाख, रुई 70 हजार, आलेगाव खुर्द 4.10 लाख, वडोली 50 हजार, निमगाव (टें.) 9 लाख, कन्हेरगाव 9 लाख, उपळवटे 3 लाख, भोगेवाडी 3 लाख, नाडी 1.75 लाख, लोणी 1.25 लाख या गावांचा समावेश आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअनादी कालापासून वारकरी संप्रदायात परिस्थिती गरिबीची मात्र, श्रीमंती मनाची याचा प्रत्यय आधुनिक युगात आला
Next articleवेळापूर येथे अर्धनारीनटेश्वर देवाचा हळदी सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here