माढा ते अकलूज या दोन तालुक्यांना जोडणारा चौपदरी महामार्ग मंजूर करावा.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली.


माढा ( बारामती झटका )


मौजे बेंबळे ता.माढा. जि. सोलापूर या गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आहे .तर माढा, चिंचोली, भूताष्टे,पडसाळी, भेंड,व्होळे,वरवडे,परिते,बेंबळे, वाफेगाव व अकलूज यामार्गे जाणारे लोकांची रहदारी या मार्गे जास्त आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याची माढा लोकसभा खासदार श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर जि. प. समाज कल्याण माजी. सभापती श्री. शिवाजी कांबळे यांनी या भागातील लोकांच्या अडचणी समजून या महामार्गाची मागणी केली यावेळी माणचे आमदार जयकुमार गोरे पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर येथे विठ्ठलाचे मंदिर आहे. आषाढी व कार्तिकी वारीसाठी पन्नास ते साठ दिंड्या वारकरी व पालखी घेऊन पंढरपूरला यामार्गे जातात. या मार्गे पंढरपूरला चालत जाणारे वारकरी दिड ते दोन लाखापेक्षा भाविक चालत जातात.
दैनंदिन या रस्त्यावरून बेंबळे, घोटी, कान्हापुरी ,सांगवी, वाफेगाव ,माळीनगर, अकलूज या परिसरातील हजारो लोक दररोज या रस्त्याने ये जा करतात. त्याच बरोबर या मार्गाने शेतामध्ये पिकवला जाणारा सर्व मालाची वाहतूक या मार्गेच केली जाते.
सध्या या मार्गावर अनेक छोटे मोठे खड्डे असून वाहन धारक मोटारसायकल चालक , वाटसरू व वारकरी यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे टेंभुर्णी ते पंढरपूर हा मार्ग रहदारी साठी अतिशय छोटा असून या मार्गावर ती अनेक छोटे-मोठे अपघात सतत घडत असतात.
त्यासाठी नितींजी गडकरी यांच्याकडे विनंती करण्यात आली टेंभुर्णी, बेंबळे ,घोटी व चांभार विहिर या मार्गास पालखी मार्ग दर्जा देऊन आपल्या माध्यमातून चौपदरी व काँक्रिटीकरण करण्यासाठी योग्य ते निधी उपलब्ध करून देऊन लवकर लवकर काम सुरू करण्यात यावे त्यामुळे या परिसरातील भाविक वाटसरू व नागरिकांची अडचण दूर होईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article‘स्वेरी’मध्ये बुधवारी लसीकरण शिबिराचे आयोजन संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती
Next articleएकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीच्या लढ्यात सामिल व्हा. – रणजित बागल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here