माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माळशिरस तालुक्याच्यावतीने सन्मान.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाला सर्वसामान्य जनतेचा उदंड प्रतिसाद, शुभेच्छांचा वर्षाव झाला.

फलटण ( बारामती झटका )

माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस दि. 19 फेब्रुवारी या दिवशी भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने राजभवन निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य सोलापूर जिल्हा प्रभारी के.के. पाटील, भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका नारनवर, भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, भाजपा अनुसूचित जाती जिल्हा कार्यकारणी सदस्य लालासाहेब साळवे, निमगावचे युवा नेते मिनीनाथ मगर आदी मान्यवरांनी लोकप्रिय खासदार यांचा सन्मान केला.


माढा लोकसभा मतदार संघाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा खासदार मिळालेला आहे. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन सरचिटणीस श्रीकांतजी भारतीय यांचे विशेष करून माढा लोकसभा मतदारसंघावर लक्ष आहे. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी विकास कामासाठी पाठपुरावा केल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्नांना केंद्र सरकारच्या माध्यमातून सहकार्य मिळत आहे. अनेक रस्त्याचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. लोणंद-पंढरपूर रेल्वे मार्गाचा प्रश्न खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागलेला आहे.

अशा विकासप्रिय खासदाराच्या वाढदिवसाला सर्वसामान्य जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला असून दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांनी लाडके खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यासाठी तोबा गर्दी केली होती. मतदार संघात अनेक ठिकाणी खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन त्यामध्ये रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवून लोकप्रिय लाडके खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस मोठ्या थाटात व उत्साही वातावरणात संपन्न झाला.


यावेळी बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनीही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleखासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरसचे नूतन नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख यांचा सन्मान केला.
Next articleनिमगांव (म.) येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here