माणसाला मरण यातनेच्या यमदूताच्या दारातून आणणाऱ्या देवदुताचा आनंदाने सन्मान.

माढा तालुक्यातील पीडित माणूस नागनाथ वाघमोडे यांनी माणसातील देव डॉक्टर सचिन शेंडगे यांच्या उपचाराची कृतज्ञता व्यक्त केली.


विझोरी ( बारामती झटका )

माढा तालुक्यातील बादलेवाडी येथील 85 वर्षीय आजोबा नागनाथ गणपत वाघमोडे यांनी माणसातील देव डॉक्टर सचिन शेंडगे यांच्या उपचाराची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माणसाला मरण यातनेच्या यमदुताच्या दारातून सुटका करणाऱ्या देव दुताचा सन्मान करीत असल्याची भावना वाघमोडे परिवार यांची झालेली आहे.
नवनाथ गणपत वाघमोडे वय 85 वर्ष राहणार बादलेवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील आहेत त्यांना अनेक दिवसापासून हात आणि पाय हलवता, उचलता येत नव्हते. महाराष्ट्रातील अनेक डॉक्टर दवाखाने आयुर्वेदिक पंचकर्म सर्व करून थकलेले होते आजोबांचे वय झालेले असल्याने त्यांनाही वेदना असह्य होत होत्या अशावेळी माळशिरस तालुक्यातील गोरगरिबांचा देवदूत म्हणून विझोरी गावचे डॉक्टर सचिन शेंडगे यांच्याकडे पाहिले जाते डॉक्टरांनी आज पर्यंत अनेक रुग्णांना कमी पैशांमध्ये सेवा देऊन रुग्णांना दिलासा दिलेला आहे. अनेक रुग्णांचे मित्र परिवार नातेवाईक यांना आलेल्या अनुभवावरून आपल्या नात्यागोत्यातील लोकांना डॉक्टर सचिन शेंडगे यांच्या विषयी माहिती देत असतात वाघमोडे परिवार सर्व उपचार करून थकलेले होते शेवटचा उपचार म्हणून त्यांनी आजोबांना डॉक्टर शेंडगे यांच्या निमगाव पाटी येथील दवाखान्यात गाडीमध्ये बेडशीट मध्ये गुंडाळून आणलेले होते. डॉक्टरांनी औषध गोळ्या इंजेक्शन देऊन निश्चित फरक पडेल असा आत्मविश्वास दिलेला होता. काही दिवसाचा अवधी गेला. नागनाथ वाघमोडे आज गुरुवार दिनांक 30/ 12 /20 21 रोजी दुपारी डॉक्टर शेंडगे यांच्या दवाखान्यात येऊन डॉक्टर तुमचा सन्मान करायचा आहे असे सांगितले डॉक्टरांना प्रश्न पडला तीन गुंडाचा शर्ट, पांढरे शुभ्र मखमली धोतर, रुबाबदार फेटा असा पेहराव असणारा माणूस आपला सत्कार का करीत आहेत असे वाटले असावे त्यावेळेस वाघमोडे यांनी सांगितले डॉक्टर मला ओळखलं का ? तुम्ही मला बेडशीट मध्ये गुंडाळून आणलेले होते त्यावेळेस इंजेक्शन व औषध गोळ्या दिलेला मी तुमचा पेशंट आहे असे सांगून डॉक्टरांना आलिंगन दिले. माझ्या परिवारातील सदस्य आपला सन्मान करण्याकरता आलेलो आहे आणि डॉक्टरांचा सन्मान वाघमोडे परिवार यांच्यावतीने करण्यात आला.
आजोबा नागनाथ वाघमोडे यांनी सांगितले अनेक वर्ष हात पाय हलत नसल्याने मरण यातना यमाच्या दारात भोगत होतो यातनेच्या दारातून माझी सुटका झालेली आहे त्यामुळे माणसातील देव असणारा देवदुताचा सन्मान करण्याकरता आलेलो आहे. आपण केलेल्या उपचाराची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. डॉक्टरांनीही आजोबांचा सन्मान स्वीकारला वाघमोडे परिवारातील सर्वांना चहापाणी करून सर्वांना धन्यवाद दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअंधश्रद्धेला फाटा देऊन वडिलांचा कुटुंबाने केला तिसरा.
Next articleकण्हेर गावातील पै. कालिदास रुपनवर युवकाने वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here