माणूस आयुष्यामध्ये किती जगला, यापेक्षा कसा जगला याला महत्त्व आहे – झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर बोराटे महाराज

स्वर्गीय हनुमंत आबा वाघोले यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांची विशेष उपस्थिती.

पुरंदावडे ( बारामती झटका )

माणसाला मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर माणसाने समाजातील सर्व लोकांची कामे करून, आपुलकीने वागून समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले पाहिजे. जन्माला आलेल्या मनुष्याचा एक दिवस मृत्यू होत असतो. मृत्यू हा अटळ आहे. माणूस आयुष्यामध्ये किती जगला यापेक्षा, कसा जगला याला महत्त्व आहे. हनुमंतआबांना जे काही आयुष्य लाभले ते त्यांनी स्वतःचा परिवार व समाज कार्यासाठी खर्ची घातलेला आहे. माझ्या मनामध्ये ते आदर्शस्थानी होते. जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला या न्यायाप्रमाणे आबांचा मृत्यू झालेला आहे. असे मौलिक विचार झी टॉकीज फेम सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. सागर बोराटे महाराज यांनी पुरंदावडे येथे स्वर्गीय हनुमंत आबा तुळशीराम वाघोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त मंगळवार दि. 17/05/2022 रोजी आयोजित केलेल्या कीर्तनामध्ये उपस्थित श्रोत्यांना किर्तनरुपी सेवेमध्ये सांगितले.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख आमदार, आ. राम सातपुते यांचे विशेष सहकारी हरिभाऊ पालवे उपस्थित होते. झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांनी प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सर्व परिचित असणारा अभंग
तो एक संता ठाई,
लाभ पायी उत्तम,
म्हणविता त्यांचे दास,
पुढे आस उरेना,
कृपादान केले संती,
कल्पांती हे सरेना,
तुका म्हणे संत सेवा,
हेचि देवा उत्तम.
या अभंगावरती ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांनी समाजामधील चालीरीती, अनिष्ट परंपरा यावर घणाघात करून अध्यात्मातील अनेक उदाहरणे देऊन उपस्थित श्रोत्यांना कधी डोळ्यांमध्ये अश्रू तर कधी ओठांवर हसू आणलेले होते.

अतिशय सुश्राव्य असं कीर्तन करून समाज जागृती केली. कीर्तनामध्ये मृदंगाचार्य अभिमन्यु महाराज कदम, दहिगाव यांनी उत्कृष्ट मृदंग वाजवून साथ दिली. गायनाचार्य दशरथ गोरड महाराज, माऊली दनाने महाराज, बापूराव टेळे महाराज यांनी उत्कृष्ट गायन केले. कीर्तनाला साथ ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व पुरंदावडे सदाशिवनगर, येळीव जाधववाडी, मांडवे, माळशिरस येथील भजनी मंडळ यांनी साथ दिली.श्रीमती वर्षा हनुमंत वाघोले, चि. रणजित व कु. ऋतुजा हनुमंत वाघोले, सौ. आशादेवी व श्री. कृष्णा तुळशीराम वाघोले यांनी स्वर्गीय हनुमंत आबा यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून महाआरती केली.

शिवामृत दूध उत्पादक संघामध्ये केमिस्ट पदावर हनुमंतआबा वाघोले कार्यरत होते. कोरोनाची बाधा झालेली होती. दवाखान्यामध्ये वाघोली परिवाराचे अथक परिश्रम सुरू होते. 27 दिवसानंतर आबांची प्राणज्योत मावळलेली होती. आबांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि बंधू कृष्णा हे पाली येथे शिक्षक आहेत. या परिवारातील सर्व सदस्यांनी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.

सदरच्या कार्यक्रमासाठी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते हे वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिले. त्याचबरोबर पुरंदावडे, सदाशिवनगर, मांडवे, येळीव जाधववाडी येथील मान्यवरांसह नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवामृत दूध संघाचे अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत, सरपंच देविदास ढोपे, सोमनाथ पिसे, पत्रकार विष्णुपंत भोंगळे यांच्यासह समाज बांधव यांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्वांची कृतज्ञता वाघोले परिवार यांनी व्यक्त केली.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleEnable and Disable Two Factor Authentication for Apple ID
Next articleमाळशिरस तालुक्यातील जनतेच्या सूखदुखात आ.राम सातपुते यांच्या सहभागाने माणुसकीची दर्शन घडून आत्मीयता निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here