माण-खटावसाठी ७९ सिमेंट बंधारे मंजूर, प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून विकासकामे


दहिवडी (बारामती झटका)

माण-खटाव मधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ७९ सिमेंट बंधारे निर्मितीसाठी जलसंधारण मंत्रालयाला प्रस्ताव दिला होता. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून पहिल्याच प्रयत्नात बंधाऱ्यांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दहिवडी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत दिली

यावेळी देशमुख म्हणाले की, जलसंधारण खात्याचा सचिव असताना मी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत माणगंगा नदीसाठी ११ कोटी, बाणगंगा नदीसाठी १४ कोटी, वसना नदीसाठी ७ कोटी, येरळा नदीसाठी ९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून साखळी सिमेंट झाल्याने नदीकाठी असलेल्या विहिरी उन्हाळ्यातही पाण्याने भरलेल्या असतात. त्यामुळे दोन्ही तालुक्यांमधील शेतकऱ्यांना उसाचे उत्पादन घेता येते. पाणलोट विकास प्रकल्पाच्या माध्यमातून १७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. हा प्रकल्प राबवल्याने माण आणि खटावमध्ये भूजल पातळी कमालीची वाढल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले. जिल्ह्यात माण खटाव तालुक्यात पाणी पातळी सर्वाधिक असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने जाहीर केले होते. शेतीसंबंधी शासनाचे सर्व प्रकल्प माण खटावमध्ये राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

माणमध्ये ५४ व खटावमध्ये २५ सिमेंट बंधारे मंजूर झाले आहेत. माण तालुक्यात नरवणे प्रत्येकी पाच, शिंदी खुर्द, मलवडी प्रत्येकी चार, पळशी, वडजल प्रत्येकी तीन, बिदाल, बिजवडी, दानवलेवाडी, धामणी, जाधववाडी, इंजबाव, धुळदेव, ढाकणी, दहिवडी, पांगरी प्रत्येकी दोन, पिंगळी खुर्द, रांजणी, टाकेवाडी, घोडेवाडी, डंगिरेवाडी, ढाकणी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात पिंपरीच्या चार, सुर्याचीवाडी, बनपुरी, मरडवाक, औंध प्रत्येकी तीन, वाकेश्वर दोन, मोराळे, तरसवाडी प्रत्येकी एक, मोराळेत दरवाजे असलेले तीन सिमेंट बंधारे, वाकेश्वरमध्ये कोल्हापूर पद्धतीचे दोन बंधारे मंजूर झाले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपोलीस पाटलांना सहकारी संस्थेच्या निवडणुका लढवता येणार, राज्य सरकारच्या शासन निर्णयावर शिक्कामोर्तब
Next articleराज्याच्या हक्काचे पैसे वेळेत का मिळत नाही, रविकांत वरपे यांचे ट्वीट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here