माती परिक्षणावर आधारित पिकानुसार खत नियोजन – सतीश कचरे, मंडळ कृषि अधिकारी

रासायनिक खतावरील १०% बचत मोहीम भाग – १

नातेपुते (बारामती झटका)

रशिया युक्रेन संघर्ष व रासायनिक खत कच्चा माल तुटवडा, वाढलेले इंधन व वहातूक दर यामुळे रासायनिक खताच्या किंमती खुप वाढल्या आहेत. याचा प्रत्यक्ष परिणाम पिकाच्या उत्पादन खर्च वाढीवर होत असून वाढत्या महागाईमुळे निव्वळ नफा प्रमाण कमी होत चालले आहे. म्हणून मातीपरिक्षणावर आधारित एकात्मिक (खत), जमिनीतील उपलब्धता व पिकाला लागणारी समतोल अन्नद्रव्ये यांचे व्यवस्थापन करणे हा एक खत व खर्च बचतीचा उपाय आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अंतर्गत जमिन आरोग्य पत्रिका मोहीम मधून सर्व गावातील माती नमुने सायकल १, २, ३, ४ अन्वये काढून माती परीक्षण अहवाल संबंधीत लाभार्थी व सहलाभार्थी यांना पोहच करून जागतिक मृदा दिन रोजी संबंधीतांना विश्लेषण करून महिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे. याचबरोबर गावचा सर्वसमावेशक सुपिकता निर्देशांक प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालयात अडकविला आहे.

माती परिक्षणावर आधारीत एकात्मिक समतोल गरजेनुसार पिकानुसार जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये प्रमाण अपेक्षीत उत्पादनानुसार अनद्रव्ये (खत) व्यवस्थापन केले तर कमीत कमी १०% खत व खर्च यामध्ये बचत होणार आहे. नातेपुते मंडळ मधील २६ गावचा सुपिकता निर्देशांक विचार करता सेंद्रीय कर्ब (नत्र ) कमी, स्फुरद मध्यम ते भरपुर व पोटॅश भरपुर प्रमाणात जमिनीत उपलब्ध आहे. घेतलेल्या पिकांचे अपेक्षीत उत्पादन घेणेसाठी मातीपरीक्षण निष्कर्ष सेंद्रीय कर्ब (नत्र ) कमी म्हणून पाचट कुजविणे ‘ हिखळीचे खत वापर, विविध प्रकारचे पेंड, कंपोस्टखत, शेणखत, भरखते बरोबर शिफारस खताची त्या पीकाची १००% मात्रा विभागून द्यावी. स्फुरद व पालाश यांचे प्रमाण मध्यम ते भरपुर परंतू बांधलेल्या स्वरुपात आहे. म्हणून त्या पिकाची शिफारस मात्रा यांचे २५ ते ३०% कमी द्यावे व स्फुरद व पालाश उपलब्धतेसाठी बी बियाणे लागवड साहित्याला पीएसबी केएसबी जीवाणूची प्रक्रिया करणे ठिबकमधून देणे सेंद्रीय कंपोस्ट खताबरोबर देणे गरजेचे आहे. यासाठी शेतकरी बंधूनी मातीपरिक्षणावर आधारित पीकानुसार समतोल एकात्मिक खत नियोजन केले तर कमीत कमी १०% खत व खर्चावरील बचत होऊन १५% पर्यंत उत्पादनात वाढ होणार आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ नफ्यांचे प्रमाणही वाढणार आहे. शेतकरी बंधूनी अधिक माहिती मार्गदर्शन व माती परिक्षण विश्लेषण व खत मात्रासाठी नजीकचे व गावचे कृषीसहायक व मंडळ कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क करावा. भाग – २ मध्ये विविध जीवाणू व त्याचा खत व खर्च बचत मधील वापर यावर महिती घेऊ या…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मुंबई येथे उत्साहात साजरी होणार – युवा नेते ॲड. प्रशांत रुपनवर
Next articleलोकप्रिय आ. राम सातपुते यांच्यावतीने कारुंडे विकास सेवा सोसायटीचे बिनविरोध नूतन चेअरमन सूर्यकांत पाटील यांचा सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here