मातोश्री रेसिडेन्सीने राबवली “एक कुटुंब, एक झाड” संकल्पना

बारामती (बारामती झटका)

दि. 24 नोव्हेंबर रोजी तांदूळवाडी येथील अजित बेलदार पाटील यांनी रेवती कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून मातोश्री रेसिडेन्सी या गृह प्रकल्पाच्या फ्लॅट धारकांना ‘एक कुटुंब, एक झाड’ ही संकल्पना राबवत प्रत्येकाला एक झाड देऊन संगोपनाचा संकल्प करून दिला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वृक्ष व झाडांवरती असलेले प्रेम पाहता, बारामतीमध्ये अनेक सामाजिक संघटना/पक्षाचे पदाधिकारी वेगवेगळ्या माध्यमातून वृक्षारोपण करत असतात. आपल्या नवीन गृह प्रकल्पाचा शुभारंभ होतोय हे औचित्य साधत अजित बेलदार पाटील यांनी आपल्या आई वडिलांच्याहस्ते प्रत्येक फ्लॅट धारकांना एक झाड देऊन सन्मान केला व परिसरात वृक्षारोपण केले. शुभकार्यक्रमासाठी शुभमुहूर्त पाहिला जातो, परंतु शुभकार्याला शुभकृतीची जोड अशाच माध्यमातून दिसून येते. या दरम्यान परिसरातील नागरिकांनी व उपस्थितांनी या कार्यक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले.
यावेळी अजित बेलदार पाटील, वाघे असोसिएट्सचे सतीश वाघे, पत्रकार योगेश नालंदे, निवेदक धनंजय माने, सर्व फ्लॅट धारक व इतर मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर गावातील आदर्श व्यक्तिमत्व, युवकांचा आदर्श, भविष्यातील उगवता तारा, संदीपतात्या…
Next articleप्रो. डॉ. सुभाष वाघमारे यांची माणुसकीचे दर्शन देणारी कविता…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here