मारकडवाडी (बारामती झटका)
मारकडवाडी ता. माळशिरस येथे जय बजरंगबली तरुण मंडळ व गोरे वस्ती हनुमान नगर यांच्यावतीने मंगळवार दि. २९ मार्च २०२२ रोजी हळदी कुंकू व सुवासिनी कार्यक्रम आणि भव्य आराधी मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हळदीकुंकू व सुवासिनी कार्यक्रमाची वेळ दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत आहे. तर, आराधी मंडळाची स्पर्धा सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे.
या स्पर्धेमध्ये जय बजरंगबली तरुण मंडळ गोरे वस्ती, हनुमान नगर, मारकडवाडी यांच्यावतीने ५००१/- रुपयांचे प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे, तर मारकडवाडीचे सरपंच अमित वाघमोडे, पांडुरंग चोपडे, सोपान काका वाघमोडे, दादा गोरे यांच्याकडून ३००१/- रुपयांचे द्वितीय बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच आप्पा महादेव मारकड, गजानन गोरे, हनुमंत गोरे, नामदेव राऊत यांच्याकडून २००१/- रुपयांचे तृतीय बक्षीस देण्यात येणार आहे. तर आराधी मंडळ गोरे वस्ती व बोराटे वस्ती यांच्या वतीने १००१/- रुपयांचे चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी गजानन गोरे ९७३०८७४४६४, हरी बोराटे ९८९०४८१८३५, सावता गोरे ९७६६४३३६४५, पांडुरंग चोपडे ९०११७०७३५७ यांच्याशी संपर्क साधावा. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng