डॉ. शामल पाटील यांच्या ‘महिला दातांचा दवाखाना’ हॉस्पिटलचे उद्घाटन माळशिरस शहरात दिमाखात संपन्न
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायतमुळे माळशिरस शहराचा विकास झपाट्याने होत आहे, लोकवस्ती वाढत आहे. अशावेळी माळशिरस शहरात व परिसरातील माता-भगिनींसह सर्वच माळशिरसकरांच्या दाताच्या समस्याची अडचण दूर होणार आहे. माळशिरस शहरात दवाखाना सुरू केल्याबद्दल धन्यवाद देऊन भविष्यामध्ये अडचणी असल्यास सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी माळशिरस शहरातील डॉ. पाटील दाताचा दवाखाना या हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले.

माळशिरस शहरात महिला डॉ. शामल पाटील यांचा पहिलाच दाताचा दवाखाना झाला असून या दवाखान्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे, माळशिरसचे विद्यमान उपनगराध्यक्ष डाॅ. मारुतीराव पाटील, लोणंद-फलटण रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे, माजी पंचायत समिती सदस्य माळशिरसचे संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंददादा कुलकर्णी, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सूळ पाटील, डॉ. दत्तात्रय सर्जे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता शिंदे, राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठनेते विकासदादा धाईंजे, नगरसेवक आकाश सावंत, मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, बाळासाहेब वावरे, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष बाबासाहेब माने, युवा उद्योजक सचिन वावरे, अनिल सावंत, नगरसेवक संतोषआबा वाघमोडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, वस्ताद विजयराव देशमुख, ॲड. दादासाहेब पांढरे, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे, ॲड. आकाश पाटील, रशीद शेख, शामराव वाघमोडे, नीलकंठ पाटील, रमेश धाईंजे, भैय्या धाईंजे, जेशीतल पाटील, विक्रम पाटील, नगरसेवक गंगाधर पिसे, सुरेश वाघमोडे, मतीन बिद्रे, डॉ. पराग किसवे, डॉ. नितीन सिद, डॉ. अनिल पाटील, डॉ. आप्पासाहेब टेळे, डॉ अमोल वाघमोडे, डॉ महादेव वाघमोडे,डाॅ संजय गायकवाड, डॉ विकास काळे, डॉ सचिन केमकर,सौ रेश्मा टेळे,डाॅ आरती किसवे अमित दोशी राजाभाऊ काशीद, संतोष गुरव, डॉ. विजय दीक्षित, भाऊ थोरात, निवृत्ती करे, लखन सावंत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दीपकरत्न गायकवाड, डॉ. विश्वनाथ वडजे, रमेश पाटील, डॉ. सर्जे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब कर्चे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत पाटील यांनी मानले. यावेळी हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत पाटील, डॉ. शामल पाटील यांना आलेल्या सर्व मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.\

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
