भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे महाराष्ट्राबाहेर नेहमी सहकार्य – मांडकी गावचे सुपुत्र युवा उद्योजक सुग्रीवदादा निंबाळकर.
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे महाराष्ट्राच्या बाहेर उद्योग-व्यवसायानिमित्त गेलेल्या लोकांना अडचणी आल्यानंतर महाराष्ट्रीय लोकांच्या मदतीला धावून जाणारे लोकप्रतिनिधी आमचे मैत्रीपूर्ण संबंध असणारे मित्रबंधू राम सातपुते यांचे नेहमी सहकार्य असल्याचे मत मांडकी गावचे सुपुत्र युवा उद्योजक सुग्रीवदादा निंबाळकर यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पाण्यापासून वंचित असणाऱ्या दुर्गम भागातील मांडकी गावचे सुपुत्र युवा उद्योजक सुग्रीवदादा निंबाळकर उद्योग व्यवसायानिमित्त पुणे परिसर व महाराष्ट्राबाहेर असतात, त्यामुळे उद्योग-व्यवसायातील अनेक मित्र त्यांच्याशी जोडले गेले आहेत. महाराष्ट्रातील युवा उद्योजक यांनी सुद्धा महाराष्ट्राबाहेर परराज्यात जाऊन आपले उद्योग व्यवसाय उभारलेले आहेत. अशा वेळी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. आ. राम सातपुते हे माळशिरस विधानसभेचे लोकप्रतिनिधी होण्याअगोदर चळवळीमध्ये काम करीत असताना सुग्रीवदादा निंबाळकर यांच्यासारखे उद्योग क्षेत्रातील अनेकांचे हितसंबंध आहेत. आमदार राम सातपुते लोकप्रतिनिधी झाले तरीसुद्धा त्यांची जुन्या मित्रांची संगत कायम आहे. अडीअडचणीला मदत करणारे ते लोकप्रतिनिधी आहेत, असे युवा उद्योजक सुग्रीवदादा निंबाळकर यांनी सांगितले. आमदार राम सातपुते यांनी मदत केलेले अनेक किस्से आहेत. त्यापैकी त्यांनी काही किस्से सांगितले आहेत.

युवा उद्योजक सुग्रीवदादा निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले की, आमचे मित्र श्री. दानवले (कोऱ्हाळे) बारामती हे फॅमिली सहित मैसूरला गेले असताना त्यांच्या गाडीचा एक्सीडेंट झाला होता. समोरील व्यक्ती हा लोकल रहिवासी होता. त्याची मांडी फ्रॅक्चर झाली होती. त्यामुळे त्यांना तेथे लोकल लोकांपासून खूप त्रास झाला. त्यांचा मला कॉल आल्यानंतर मी आमचे बंधू आ. रामभाऊ सातपुते यांच्या कानावर ही बातमी घातली असता त्यांनी तात्काळ बीजेपीचे तेथील प्रतिनिधी श्री. किरण गोडा यांना सूचना देऊन ते प्रकरण दीड तासामध्ये मिटवले व श्री. दानवले यांना सुखरूप घरी पाठवले. त्याबद्दल मी आ. रामभाऊ सातपुते यांचा आभारी आहे. आमदार साहेब नेहमीच महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही लोकांना मदत करत असतात त्याबद्दल त्यांचा आभारी आहे.
आरा (बिहार) येथे गेली अनेक वर्ष बिझनेससाठी गेलेले आमचे सहकारी श्री सचिन देशमुख राहणार माऊली ( विटा, मायणी ) यांनाही तेथे फार मोठी अडचण आली होती. त्यांचाही प्रॉब्लेम रामभाऊ सातपुते यांनी तेथील लोकल भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना सांगून मार्गी लावला. त्यांनाही फार मोठी मदत झाली.
गोवा विधानसभा प्रचारादरम्यान असताना बारामती (वाघळवाडी ) येथील श्री. स्वप्नील सतीश जाधव यांचा एक्सीडेंट झाला होता ते फार सिरीयस होते. तिथेही त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व प्रकरण मार्गी लावून त्यांना त्यांना मदत केली. वेळोवेळी आमदार साहेबांची मदत होत असते.
आमदार राम सातपुते यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक उद्योगातील व्यवसायिकांना अडचणीच्या काळात मदत केलेली आहे. अशा लोकप्रतिनिधीचा नेहमीच आम्हाला युवा उद्योजकांना गर्व आहे. अशा लोकप्रतिनिधीची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng