भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार यांनी कट्टर समर्थक पै. बापूराव ज्ञानदेव निटवे यांच्या मागणीची केली पूर्तता.
फरतडी ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील फरतडी निटवेवाडी शिवारवस्ती या ग्रुप ग्रामपंचायतीच्या निटवेवाडी येथील मारुती मंदिरास भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सण 2020 – 2021 या आर्थिक वर्षातील 2515 अंतर्गत सुचवलेल्या मारुती मंदिरास सहा लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे कट्टर समर्थक पै. बापूराव ज्ञानदेव निटवे यांनी निटवेवस्ती येतील मारुती मंदिरास दर्शनासाठी आलेल्या हनुमान भक्तांची ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी सभामंडपाची मागणी केली होती. कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर आमदार राम सातपुते यांनी हनुमान भक्तांची अडचण दूर करून सहा लाख रुपये निधी मंजूर करुन घेतलेला होता.
मारुती मंदिराच्या सभामंडपाचे काम अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी यंत्रणेच्या अधिपत्याखाली महालक्ष्मी मजूर सहकारी संस्था मर्यादित अकलूज यांच्या नावे सदर सभामंडपाचे काम पै. बापूराव ज्ञानदेव निटवे यांनी दर्जेदार व उत्कृष्ट काम करून घेतलेले आहे. त्यांना सभा मंडप उभारणी करण्यासाठी सचिन सिताराम निटवे यांची मोलाची साथ मिळालेली आहे. मारुती मंदिर परिसरात भव्य आणि दिव्य सभामंडप दिसत आहे. निटवेवाडी पंचक्रोशीतील हनुमान भक्तांची आमदार राम सातपुते यांनी अडचण दूर केलेली आहे.

हनुमान भक्तांच्या अडचणीला राम धावून आल्याने आमदार राम सातपुते यांचे भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पैलवान बापूराव ज्ञानदेव निटवे यांनी दर्जेदार बांधकाम केलेले असल्याने त्यांचा गावातील लोकांनी सन्मान करून भविष्यामध्ये आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी ठाम उभे राहू असा जनतेमधून सूर होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng