माळशिरसमधील अहिल्यादेवी चौक बनला मृत्यूचा सापळा, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस शहरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी म्हसवड चौक या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात होऊन चौक मृत्यूचा सापळा बनलेला आहे. नगरपंचायत, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. पहाटेच्या वेळी मोटरसायकल धडकवून मोठे वाहन निघून गेलेले आहे. चौकामधील सीसीटीव्ही सुरू असतील तर वाहन सापडण्यास मदत होईल. मोटरसायकल चालक दवाखान्यात उपचार घेत आहे. त्यांच्याकडून सविस्तर माहिती मिळेल. सीसी टीव्ही बंद असतील तर नगरपंचायतीने त्वरित सुरू करणे गरजेचे आहे.

माळशिरस तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा सत्र दिवाणी व फौजदारी न्यायालय, तालुका कृषी कार्यालय, सामाजिक वनीकरण, वनविभाग, भूमी अभिलेख कार्यालय, अशी अनेक कार्यालय माळशिरस शहरात असल्याने तालुक्याच्या गावातील लोकांची शासकीय कामानिमित्त ये जा सुरू असते.
माळशिरस शहरातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आळंदी-पुणे-पंढरपूर हा रस्ता गेलेला आहे. अहिल्यादेवी चौकामध्ये म्हसवड-अकलूज-टेंभुर्णी हा रस्ता गेलेला आहे. दोन्हीही रस्त्याची नेहमी वर्दळ असते. अहिल्यादेवी चौकाच्या परिसरात ग्रामीण भागातून आलेल्या लोकांची वर्दळ असते. नेहमी गजबजलेला चौक येणाजाणाऱ्या वाहनांची गर्दी, त्यामुळे चौकात नेहमी छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे सदरचा चौक हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे, अशी भावना लोकांची झालेली आहे.

यासाठी नगरपंचायत, पोलीस स्टेशन, नॅशनल हायवेचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष देऊन अहिल्यादेवी चौकाच्या चारी बाजूला गतिरोधक करणे गरजेचे आहे. चौकामध्ये अतिक्रमण असतील तर अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. अशा उपाययोजना केल्याशिवाय अपघाताचे प्रमाण कमी होणार नाही. यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे, नागरिकांमधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे
Next articleमाळशिरस येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here