माळशिरसमधील विजय कोणा व्यक्तीचा नव्हे, भाजप पदाधिकाऱ्यांचा मोहिते पाटलांना टोमणा

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायतीवर विजय एका व्यक्तीचा नाही तर भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेला सकारात्मक प्रतिमेचा विजय असल्याची भावना भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा प्रभारी के. के. पाटील यांनी व्यक्त केली. हा विजय मोहिते पाटील गटाचा असल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत, त्या संबंधित टोमणा के. के. पाटील यांनी मोहिते-पाटील यांना लावला.

जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. माळशिरस तालुक्यातील महाळुंग-श्रीपुर तसेच नातेपुते नगरपंचायत मोहिते-पाटील यांना मांडणाऱ्या गटाने सत्ता काबीज केली. मोहिते-पाटील समर्थक गट असल्याने या दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता येणार असली तरी भाजप पक्षाच्या नावावर लढलेल्या माळशिरस नगरपंचायतीत मोठे यश मिळाले आहे.

यासंदर्भात के. के. पाटील म्हणाले की, श्रीपुरमध्ये पक्षाचे पदाधिकारी असताना अपक्ष म्हणून लढणार, या दोघांनाही पक्षाने निलंबित केले आहे. विशेष म्हणजे या दोघांचाही निवडणुकीत पराभव झाला. या दोन्ही उमेदवारांना अपक्ष म्हणून कोणी उभा केले, हा मोठा चर्चेचा विषय आहे. माळशिरस नगरपंचायतीत झालेला विजय भाजपच्या विचारांचा विजय आहे. भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रतिमेवर माळशिरसकरांनी विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव तालुक्यात जाणवला. मात्र,  येत्या काळात देखील तालुक्यात व जिल्ह्यात भाजपच कायम राहणार असून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमचे विशेष लक्ष राहणार असल्याची माहिती के. के. पाटील यांनी सांगितली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्या काळात जिल्ह्यात संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी काम करू, असे देखील पाटील यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील नगरपंचायत निवडणुकीत दोन अंकी मतदानाचा आकडा न गाठलेले उमेदवार
Next articleजिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता यांची चुकीच्या रस्त्याची नोटीस – संतोष पाटील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here