माळशिरसमधील सार्वजनिक आरोग्य व गृह विभागाच्या मागण्यांसाठी आमदार राम सातपुते यांनी सभागृहात वेधले लक्ष

प्रलंबित आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे मार्गी लावा व पोलीस वसाहत आधुनिकीकरणाची मागणी

माळशिरस तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार राम सातपुते अधिवेशनात आक्रमक

मुंबई (बारामती झटका)

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी आक्रमकपणे माळशिरस तालुक्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेतले. 2021-22 या वर्षाच्या पुरवण्या मागण्यांवर गृहविभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत तालुक्यातील अनेक समस्या व मागण्या त्यांनी मांडल्या. माळशिरस, अकलूज, वेळापूर, नातेपुते, पिलीव या ठिकाणी या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी निवासस्थानाची व्यवस्था व्हावी, तसेच शस्त्रास्त्रे, नवीन अत्याधुनिक वाहने आणि आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केंद्रीय विद्यालयात राखीव कोटा असला पाहिजे. यासोबतच महसूल कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पोलीस विभागातीलही कर्मचाऱ्यांना मानधन आणि पगाराची तरतूद करण्याची मागणी आमदार राम सातपुते यांनी सभागृहात बोलताना केली.

दरम्यान तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध समस्या आणि मागण्यांवर बोलत असताना आठ उपकेंद्र व चार प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रस्ताव पडून आहेत याकडे सभागृहाचे लक्ष वेधत आरोग्य विभागाने ते तातडीने मार्गी लागावेत अशी मागणी केली. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण आरोग्य केंद्रात कर्मचारी व आरोग्य सेवकांची कमतरता असल्याने रुग्णांची हेळसांड होते, यासाठी आरोग्य विभागाने तातडीने कर्मचारी कमतरता भरून काढावी अशीही मागणी यावेळी केली.

माळशिरस शहरातून महामार्ग गेल्याने अनेक शहर आणि गावे या शहराला जोडली आहेत, अनेक ठिकाणच्या रुग्णांची सोय व्हावी यासाठी अत्याधुनिक दर्जाचे ट्रामा केअर सेंटर उभा करण्याची मागणी आमदार राम सातपुते यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सातपुते यांनी सभागृहात लक्ष वेधून घेत केलेल्या या मागण्यांमुळे माळशिरसकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरत्नत्रय पतसंस्थेचा १८ वा वर्धापन दिन व महिला दिन उत्साहात साजरा
Next articleनातेपुते पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here