माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यामधील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यांची माळशिरस येथील माळशिरस नगरपंचायतचे नगरसेवक रणजीतशेठ मोटे यांच्या संपर्क कार्यालयात आत्मचिंतन बैठक संपन्न झाली. यावेळी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख, संजयअण्णा मोटे, लक्ष्मणतात्या सानप, महादेवआण्णा नरोटे, पै. सोमनाथ चव्हाण, शिवराज उर्फ भैय्या निंबाळकर, आदी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाही. अनेक कामे कितीतरी दिवस पूर्ण करून सुद्धा शासनाकडून पैसे मिळालेले नाहीत. रस्त्याची कामे करण्याकरता खाजगी व्यक्ती अथवा बँकेकडून कर्ज काढून कामे पूर्ण केलेली आहेत. शासनाकडून कामाच्या बिलाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने ठेकेदारांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. अडचणी लक्षात घेऊन शासनाने त्वरित थकीत बिलाची रक्कम कॉन्ट्रॅक्टरला अदा करावी, यासाठी सदरची आत्मचिंतन बैठक संपन्न झाली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng