माळशिरसमध्ये झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य किर्तन.

स्वर्गीय राजाराम कृष्णा सपकाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरसमधील जाधववस्ती येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय राजाराम कृष्णा सपकाळ यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दि. ६ मार्च २०२२ रोजी आहे. त्यानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे नातेपुते यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये होणार आहे. बारा वाजता पुष्पवृष्टी होउन महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन धर्मपत्नी श्रीमती सुभद्राबाई राजाराम सपकाळ, चिरंजीव श्री दत्तात्रय, महादेव, शिवाजीराव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

स्वर्गीय राजाराम कृष्णा सपकाळ यांचा जन्म अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कुटुंब असणारे कृष्णा व धोंडाबाई यांच्या घराण्यांमध्ये झालेला आहे. त्यांचे वास्तव्य म्हसवड येथे होते. कृष्णा सपकाळ व धोंडाबाई यांना तीन मुले राजाराम, सखाराम, खंडू एक मुलगी वेणूबाई अशी चार अपत्ये होती. प्रतिकूल परिस्थितीमुळे म्हसवड येथे उदरनिर्वाहासाठी अडचण येत असल्याने माळशिरसमधील जाधववस्ती येथे सपकाळ परिवार वास्तव्यास आलेले होते. प्रतिकूल परिस्थितीमुळे सपकाळ परिवारातील तिनही बंधू काबाडकष्ट करीत होते. राजाराम यांनी शेती महामंडळाच्या जनावरे, गोट्यातील शेण, घाण काढणे, बंगल्यातील किरकोळ कामे करणे अशी कामे करत तर सखाराम व खंडू शेतीची कामे करीत असत. दिवसेंदिवस कष्टाच्या जोरावर सपकाळ परिवार यांनी जाधव वस्ती येथे शेत जमीन खरेदी केली आणि त्याच ठिकाणी वास्तव्यास सुरुवात झाली.

राजाराम सपकाळ यांना तीन मुले दत्तात्रय, महादेव, शिवाजीराव, आणि तीन मुली बबई, उषादेवी, मंगलदेवी अशी सहा अपत्ये होती. राजाराम सपकाळ यांना शेतीमध्ये सहकार्य करण्याकरता दत्तात्रेय ऊर्फ तात्या यांनी आठवीतून शिक्षण बंद केले. लहान भाऊ महादेव यांनी एम.ए.बी.एड. शिक्षण पूर्ण केले तर शिवाजीराव यांना दहावी मधून शिक्षण बंद करून उद्योग व्यवसायामध्ये घेतले. दत्तात्रय सपकाळ यांनी अनेक उद्योग व्यवसाय अगदी रस्त्यावर पंचर काढण्यापासून पुण्यासारख्या शहरात डोक्यावर पाटी घेऊन घटस्थापनेसाठी लागणारी माती सुद्धा विकली. असे कष्ट करून सपकाळ परिवार यांनी माळशिरस शहरामध्ये रेणुका हॉटेल अँड स्वीट होम व्यवसाय सुरू केला. पेपर एजन्सी माळशिरस शहरांमध्ये होती, युतीच्या काळामध्ये झुणका-भाकर केंद्र होते, असे अनेक व्यवसाय सुरू होते‌. दिवसेंदिवस कष्टाच्या जोरावर सपकाळ बंधूंनी आपल्या दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवला.

राजाराम सपकाळ यांना आपल्या मुलांचा व पुतण्या यांचा नेहमी अभिमान होता‌ गेल्यावर्षी वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यामुळे सपकाळ परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. बघता बघता वर्ष संपत आलेले आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व मित्र परिवार नातेवाईक यांनी प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सपकाळ परिवार यांचेकडून करण्यात येत आहे. नजरचुकीने निमंत्रण अथवा हस्ते परहस्ते आपणापर्यंत निरोप मिळाला नसेल तर हेच आमंत्रण समजुन येण्याचे अगत्य करावे असे दत्तात्रय सपकाळ ऊर्फ तात्या यांच्याकडून आग्रहाचे आमंत्रण आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशेतकर्‍यांची वीज तोडणे पवार ठाकरे सरकारने केलेला विश्वासघात – के. के. पाटील
Next articleअखेर कोरोनाकाळ संपल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आनंदी आणि उत्साही वातावरणात सुरू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here