माळशिरस ( बारामती झटका )
अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची दि 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये सर्व जाती धर्मातील लहान थोर मंडळी साजरी करीत असतात. माळशिरस शहरातील सानिका उर्फ सानू सपकाळ या चिमुकलीची वेशभूषा खास आकर्षण ठरलेली आहे. कल्याणभाऊ पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष निळकंठ पाटील यांनी सानूचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात व उत्साहात सर्वत्र साजरी होत असते. शिवजयंती दिवशी लहान मुले वेगवेगळी वेशभूषा करून शिवजयंती साजरी करीत असतात. सानू सपकाळ हिने जिजाऊ माँसाहेब यांची वेशभूषा धारण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हातामध्ये घेतलेली होती. जिजाऊच्या लेकींचे आजसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम आहे. खऱ्या अर्थाने लहान मुलांच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा व कर्तुत्वाचा अभिमान आहे.

सानू सपकाळ तिचे आजोबा दत्तात्रेय सपकाळ उर्फ तात्या यांनीही माळशिरस परिसरांमध्ये उद्योग क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत आपले नाव कोरलेले आहे. रेणुका परिवार माळशिरसमध्ये सुप्रसिद्ध आहे. अशा परिवारातील अनिल सपकाळ यांची कन्या सानू हिच्या वेशभूषेविषयी माळशिरस परिसरात सर्व ठिकाणी चर्चा रंगली होती निळकंठ पाटलांसह अनेकांनी सानूच्या वेशभूषेचे कौतुक केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng