माळशिरस करांच्या विकास कामात नेहमी सोबत राहणार – युवा आमदार रोहितदादा पवार.

ईडीचे मुख्य प्रवर्तक किरीट सोमय्या यांनी माळशिरस मधील मोहिते-पाटील यांच्या संस्थेकडे लक्ष द्यावे काही तरी हाताला लागेल खोचक सवाल रोहितदादा पवार यांनी उपस्थित केला.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये पाण्याचा प्रश्न शासकीय जमिनीचा व इतर विकास कामांसाठी शासन दरबारी प्रयत्न करीत असताना माळशिरस करांच्या विकास कामात नेहमी सोबत राहणार असल्याचे सांगून ईडीचे मुख्य प्रवर्तक किरीट सोमय्या यांनी माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांच्या शिक्षण संस्था सुमित्रा पतसंस्था कारखाना सुतगिरण अशा अनेक संस्थांकडे लक्ष द्यावे काहीतरी धागेदोरे हाताला लागतील असा खोचक सवाल कर्जत-जामखेड चे युवा आमदार रोहितदादा पवार यांनी माळशिरस येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर उत्तमराव जानकर तुकाराम देशमुख बारामती ॲग्रो चे सुभाष गुळवे सुरेश पालवे पाटील, धैर्यशील देशमुख, ऋतुजाताई मोरे बाळासाहेब धाईंजे, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, शिवसेना तालुकाप्रमुख नामदेव वाघमारे, बाबासाहेब माने, विकास धाईंजे, नगरसेवक भगवानराव थोरात, सुरेश वाघमोडे, अण्णासो शिंदे,उद्योजक सचिनआप्पा वावरे, अजय सकट, किरण साठे, प्राध्यापक धनंजय साठे, रमेश पाटील, मच्छिंद्र गोरड, अशोकराव देशमुख, सोमनाथ पिसे, अनिल सावंत, दत्तात्रय मगर, महादेव बंडगर, अश्विनी भानवसे, तुकाराम ठवरे, सचिन देशमुख डॅडी देशमुख पप्पू देशमुख रविराज खुपसे आदी मान्यवरांसह माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी उपस्थित होते.


कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष युवा आमदार रोहित दादा पवार यांनी पुढे बोलताना सांगितले सध्या केंद्रांमध्ये भाजपचे सरकार आहे डिझेल पेट्रोल व गॅस वाढ भरमसाठ केलेली आहे सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झालेले आहे. राजकारण विकासावर होणे गरजेचे असताना भाजपने राजकारणाला वेगळी दिशा दिलेली आहे केंद्रीय संस्था ईडी, आयकर अशा अनेक लोकांना महाविकासआघाडी सरकारमधील लोकांना भीती दाखवली जाते ईडीचे मुख्य प्रवर्तक किरीट सोमय्या यांनी भाजप राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना टारगेट करून मोकळ्यात बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे किरीट सोमय्या यांना सल्ला दिला माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांच्या अनेक संस्था आहेत त्यामध्ये कारखाना शिक्षण संस्था दूध संस्था पतसंस्था या मध्ये लक्ष घालावे म्हणजे काही तरी हाताला लागेल असा खोचक सवाल उपस्थित करताच उपस्थितांच्या मधून टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टेजवरील सर्वांनी गट-तट विसरून काम करावे जनता तुमच्या सोबत आहे. माळशिरस तालुक्यातील कोणत्याही कामासाठी पुणे मुंबई मंत्रालय या ठिकाणी भेटण्यास येणाऱ्या शिष्टमंडळाला मध्ये माझा सहभाग कायम राहणार असल्याचा शब्द आपल्या भाषणांमध्ये दिला. आमदार रोहित दादा पवार यांचे अभ्यास पूर्ण भाषण संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्याचे आकर्षण ठरले सदर मेळाव्यात गेली पंचवीस वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलेले माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास धाईंजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रोहित दादा पवार यांच्या हस्ते प्रवेश केला त्यांच्यासोबत अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला रोहित दादा यांचा सन्मान तुकाराम देशमुख मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ बागणवर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आयकर विभागाची टाच वृत्त निराधार
Next articleनातेपुते येथे मुंबई गारमेंट फॅन्सी कपड्याचे भव्य शोरूम सर्वसामान्य ग्राहकांचे खास आकर्षक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here