Home इतर माळशिरस गटविकास अधिकारी खरात, विस्ताराधिकारी खरात यांची उचलबांगडी करणार कि पाठराखण ?...

माळशिरस गटविकास अधिकारी खरात, विस्ताराधिकारी खरात यांची उचलबांगडी करणार कि पाठराखण ? – अमोल शिंदे

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील पंचायत समिती स्तरावर काम करणारे विस्तार अधिकारी के. व्ही. खरात हे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक भागात काम करत आहेत. आतापर्यंत सर्व अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या ह्या दर तीन ते पाच वर्षांनी होत असतात.

परंतु, गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ खरात हे मांडवे गावचे विस्तार अधिकारी म्हणून काम करत आहे. त्यांची बदली का केली जात नाही ? असा सवाल राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष अमोल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांची बदली करा व त्यांच्या कार्यकाळातील ज्या गावाला त्यांनी काम केले आहे, त्या सर्व कामाची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष अमोल शिंदे यांनी गटविकास अधिकारी खरात यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.

तसेच शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, के. व्ही. खरात हे सर्वच गावातील काही मोजक्या पुढाऱ्यांना हाताशी धरून गावातील जनतेला वेठीस धरतात. त्यामुळे नागरिक हिताचे ते काम करत नाहीत.

त्यामुळे त्यांनी मोजक्या टोळक्यांचे ऐकूनच काम करण्याचा सपाटा गेली अनेक वर्षे लावला आहे. नेमकी या टोळक्यांकडून त्यांना कोणत्या स्वरूपात मदत होते ? हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही शिंदे म्हणाले. त्यामुळे त्यांच्यावर येत्या काळात लवकरच कार्यवाही नाही केली तर याच्या विरोधात जनतेला पावले उचलावी लागतील, असा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here