माळशिरस तहसिल कार्यालय येथे जागतिक ग्राहक दिन साजरा

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तहसिल कार्यालय येथे आज दि. १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ग्राहक पंचायतीचे आराध्यदैवत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन नायब तहसीलदार (महसुल) आशिष सानप यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तसेच ग्राहक संरक्षण परिषदेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सचिव महादेव भोसले यांनी जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व, ग्राहकांचे हक्क व कर्तव्य याविषयी सखोल माहीती, ग्राहकांचे प्रबोधन करण्याची जबाबदारी याविषयी सांगितले.   

जागतिक  ग्राहक दिन स्थापना संघटन व कार्य या विषयी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार (महसुल)अशिष सानप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व ग्राहकांच्या हिताचे  संरक्षण करण्याचे आश्वासन तहसील कार्यालयाच्या वतिने सर्वाना दिले .  

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सचिव महादेव भोसले, कोषाध्यक्ष सचिन पवार, प्रसिद्धीप्रमुख पत्रकार संजय हुलगे, कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य धोंडीराम मस्के, चावरे काका, शेख सर, अनंत कुलकर्णी, पत्रकार तानाजी वाघमोडे यांसह ग्राहक संरक्षण परिषदेचे भगवान घुगरदरे उपस्थीत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन पुरवठा विभाग तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमास तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुरवठा विभागाचे आर. जी. वाघमारे यांनी केले तर आभार पुरवठा निरिक्षक सुशांत केमकर यांनी मानले. 

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleह.भ.प. गुरव महाराज पंढरपूरकर यांचे माळशिरस येथे सुश्राव्य किर्तन.
Next articleअकलूजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मोफत स्त्री आरोग्य तपासणी शिबीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here