Uncategorized

माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील यांचा सन्मान संपन्न

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मा.बाळासाहेब वाघमोडे पाटील यांच्या शुभहस्ते गोविंद कर्णवर पाटील यांचा सन्मान

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका माळशिरस यांच्यावतीने स्नेह मेळावा, सन्मान सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. २६/१०/२०२२ रोजी सकाळी १० वाजता अक्षता मंगल कार्यालय, ६१ फाटा, माळशिरस-अकलूज रोड, माळशिरस येथे करण्यात आले होते. यावेळी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.बाळासाहेब वाघमोडे पाटील यांच्या शुभहस्ते शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील सन्मान करण्यात आला. सदरचा सन्मान ओडिसा राज्यातील देवगडचे उपवनसंरक्षक धनंजय मगर, आयएएस सागर मिसाळ, आयपीएस शुभम जाधव, आयआरटीएस डॉ. रामदास भिसे, जिल्हा न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. तसेच यावेळी माळशिरस तालुक्यातील नूतन अधिकारी, कर्मचारी तसेच उत्कृष्ट खेळाडू या शिलेदारांचा गुणगौरव व सन्मान करण्यात आला.

क्रीडा विभागामध्ये दैदीप्यमान कामगिरी करणारे कैरो येथे जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकवलेले रूद्राक्ष बाळासाहेब पाटील, भारतीय महिला क्रिकेटर आशिया चषक विजेती किरण नवगिरे, आंतरराष्ट्रीय स्वीमर पॅराओलंपिक सुवर्णपदक विजेता सुयश जाधव, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती उत्कृष्ट मार्गदर्शक क्रीडा पुरस्कार प्राप्त नारायण जाधव, महाराष्ट्र खो-खो संघाचे कॅप्टन रामजी कश्यप, महाराष्ट्र सांबू चॅम्पियन्स स्पर्धा २०२२ मधील ६८ किलो गटात प्रथम क्रमांक मिळवणारे सचिन शहाजी वळकुंदे, नव्याने अधिकारी झालेले नायब तहसीलदार इंद्रजीत घुले, नायब तहसीलदार सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अजित ढोपे, सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वीरकुमार शिंदे, सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत तरंगे, कर सहाय्यक विष्णू तरंगे, नूतन पोलीस अंमलदार सचिन पंढरीनाथ मोटे पिंपरी चिंचवड, यशवंत कदम पालघर, अक्षय मगर नागपूर शहर, सोमनाथ हुलगे मुंबई शहर, अविनाश लक्ष्मण काळे मुंबई शहर, बालाजी धस रायगड, तानाजी देशमुख पिंपरी चिंचवड, किरण मदने पिंपरी चिंचवड, अनिल लवटे पिंपरी चिंचवड, अमोल शिवाजी इंगोले ठाणे शहर, हेमंत रणनवरे मुंबई शहर, सारिका करे मुंबई शहर, गणेश तानाजी हुलगे मुंबई शहर, सत्यवान वाघमोडे मुंबई शहर, शेखर शेंडगे नवी मुंबई, पूजा बाबू तरंगे पिंपरी चिंचवड, दीपक तात्याबा गोरड मुंबई शहर, दीपक पोपट मदने मुंबई शहर, सागर सरगर उस्मानाबाद इत्यादी यशस्वी व्यक्तीचा सन्मान सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort