माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भारतीय जनता पार्टी यांचे निषेधार्थ आंदोलन.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने जन सामान्य जनतेच्या मनात संतापाची लाट

अकलूज (बारामती झटका)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचेबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला आहे, असे असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतही वाईट विधान केले आहे.

तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी अकलूज शहर काँग्रेस कमिटीचे वतीने उद्या सोमवार दि. २१/११/२०२२ रोजी सकाळी ठिक १० वा. सदुभाऊ चौक अकलूज येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

तरी आपण उपस्थित रहावे, असे आवाहन सतिशनाना संभाजी पालकर अध्यक्ष माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleहनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असणारे वश्या मारुती मंदिर परिसर विकासकामांना गती…
Next articleस्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांना प्रदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here