अकलूज( बारामती झटका )
माळशिरस तालुक्याचे पहिले सभापती व सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील यांचे ज्येष्ठ बंधू कर्मवीर कै. बाबासाहेब उर्फ मारुतराव आनंदराव माने पाटील यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्ताने अकलूज येथील विजय चौकातील कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या पुतळ्यास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच याप्रसंगी अकलूज नगर परिषदेचे मुख्यअधिकारी धैर्यशील जाधव यांनीही पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड, दादासाहेब मोरे, माजी उपसरपंच बाळासाहेब सणस, माजी सदस्य तात्या गुळवे, दादा तांबोळी, उत्कर्ष शेटे, साई बाबा ट्रस्टचे राजेंद्र आर्वे, अजित राकले, चंद्रकांत कुंभार, देवीचंद ओसवाल, अजित माने, जयंत कुलकर्णी, महादेव दळवी, विजय टोंगळे, धन्नम भोरी, अरुण राऊत, युसुफ शेख, जाफर काझी, रामलिंग सोनके हंडे वसंत वाईकर, तसेच बाबा साहेबांना मानणारे जुन्या पिढीतील अनेक नागरिक उपस्थित होते. श्री साईबाबा सेवा ट्रस्ट, लोकमान्य गणेश उत्सव मंडळ, माळशिरस तालुका मित्र मंडळाच्यावतीने कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. साईबाबा सेवा ट्रस्टचे सचिव राजेंद्र आर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रास्ताविक महादेव दळवी यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng